दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे…
देगलूर:तेलंगणातील केसीआर यांचा भारत राष्ट्र समिती पक्ष महाराष्ट्रात पाय पसरत आहे. विशेषकरून मराठवाड्यातील राष्ट्रवादी व शिवसेनेचे माजी आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते बीआरएसमध्ये दाखल होत आहेत.
केसीआर यांच्या उपस्थितीत नांदेड, संभाजीनगर येथे भव्य असे प्रवेश सोहळे झाले. या परिस्थितीत बीआरएस नेत्यांनी मराठवाड्यात पाय पसरत असले, तरी केसीआर यांच्या बीआरएसला मराठवाड्यातील जनतेचे समर्थन किती? कारण तेलंगणा व मराठवाड्यातील स्थिती अन् परिस्थितीत जमीन अस्मानचा फरक आहे. इथली शेती, माती अन् शेतकरी वर्षांनुवर्षांपासून दुष्काळ, गारपीट, नापिकी, अतिवृष्टी अशा सुलतानी व अस्मानी संकटांचा सामना करत आहेत. दाखल झालेला नाही. यामुळेच केसीआर यांचा बीआरएस मराठवाड्यात तात्पुरती वावटळ बनणार की, दीर्घकालीन गुलाबी वादळ? हे आगामी काळात कळणार आहे.
मराठवाडाच नव्हे तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातदेखील पाय पसरतअसलेल्या बीआरएस पक्षावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपाची बी टीम असल्याचे अनेकदा आरोप केला आहे. त्याला कारणही आहे. मराठवाडा, विदर्भ अथवा पश्चिम महाराष्ट्र येथून ज्या राजकीय- बीआरएसमध्ये प्रवेश केला, ते राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेस या पक्षांचे माजी आमदार व पक्ष संघटनेतील आजी-माजी पदाधिकारी आहेत. एखाद्या छोट्या-मोठ्या कार्यकत्यांचा अपवाद वगळला तर भाजपचा एकही नेता बीआरएसमध्ये. तसेच
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. ते दोनवेळा आमदार होते. एकदा अपक्ष व मनसेच्या तिकिटावर त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकली होती. गंगापूरचे माजीआमदार अण्णासाहेब माने, राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष कदीर मौलाना तीनवेळा जिल्हा परिषद सदस्य गंगाखेडचे भगवान सानप असे अनेक ठळक नेते- बीआरएसमध्ये गेले नगराध्यक्ष दिलीप गोरे, संभाजीनगरचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष फिरोज पटेल, नांदेड जिल्ह्यातून शंकर धोंडगे (माजी आमदार, राष्ट्रवादी), माणिक कदम (राज्याध्यक्ष) शेतकरी संघटना), यशपाल भिंगे (वंचित बहुजन आघाडी), मनोहर पटवारी (राष्ट्रवादी) अशी यांचा उल्लेख करता येईल. शेतकऱ्यांना दिलेल्या सोयी- सुविधांचे भांडवल करून हा पक्ष पाय पसरत आहे. तेलंगणातील केसीआर यांचे गुलाबी वादळ महाराष्ट्रात दीर्घकाळ घोंगावणार की, वावटळ बनून अल्पकाळात विसावणार? हे आगामी ‘काळातील लोकसभा व विधानसभा यां दोन निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे.
