
दैनिक चालू वार्ता हिमायतनगर
प्रतिनिधी राम चिंतलवाड
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेची हिमायतनगर तालुका कार्यकारणी आणि शहर कार्यकारणी दि.३०जुलै रोजी शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन जाहीर करण्यात आलीआहे.हि नवीन कार्यकारणी जाहीर करण्यासाठी मुख्यअतिथी प्रदेश संपर्क प्रमुख मनोज कामटे,नांदेड जिल्हाध्यक्ष शुद्धोधन हनवते,नांदेड जिल्हा महासचिव आशीष पाटील कल्याणे यांच्या उपस्थितीत मध्ये निवड करण्यात आली आहे.यावेळी हिमायतनगर तालुकाध्यक्ष पदी देवानंद गुंडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.तर तालुका महासचिव पदी गणपत नाचारे यांची बिनविरोध निवड करण्यातआली आहे. हिमायतनगर शहराध्यक्ष पदी अनिल नाईक यांची निवड करण्यात आली आहे.तर उर्वरित तालुका कार्यकारणी जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशा नुसार लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती नवीन तालुकाध्यक्ष देवानंद गुंडेकर यांनी सांगितले आहे.यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांना अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संपर्क प्रमुख मनोज कामठे यांनी मार्गदर्शन करुन निवड झालेल्या सर्वच तालुका कार्यकारिणीतील पदाधिकार्यांना पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.हि निवड झाल्याबद्दल मा.श्री.धोंडोपंत बनसोडे पत्रकार तथा तालुकाध्यक्ष लोकस्वराज्य आंदोलन हिमायतनगर,पत्रकार गंगाधर गायकवाड दिघीकर, रिपब्लिक 24 न्यूज स़ंपादक प्रशांत राहुलवाड,राम चिंतलवाड, सुभाष गुंडेकर आदी जणांनी अभिनंदन केले आहे.