
इंदापूर पोलिस स्टेशनला देण्यात आले निवेदन…
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे/इंदापूर:क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासह अनेक महापुरुषांबाबत अशोभनीय वक्तव्य करून त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास त्वरित अटक करावी तसेच त्याच्या सभांवर बंदी घालावी. अशी मागणी आज इंदापूर शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व माळी महासंघ यांनी इंदापूर पोलीस स्टेशनला निवेदन देऊन केली.
सदर निवेदनावर ॲड. नितीन राजगुरू लीगल सेल सदस्य माळी महासंघ महाराष्ट्र राज्य, विकास शिंदे माळी महासंघ जिल्हा अध्यक्ष पुणे ग्रामीण, युवराज शिंदे युवा उपाध्यक्ष पुणे जिल्हा, गणेश राऊत तालुकाध्यक्ष माळी महासंघ, सौरभ शिंदे शहराध्यक्ष, निखिल शिंदे सहसचिव, सुभाष खरे वंचित बहुजन आघाडी इंदापूर शहर अध्यक्ष, तानाजी भोंग कार्याध्यक्ष इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी, रमेश आबा शिंदे जिल्हाध्यक्ष राष्ट्र सेवा दल, कीर्ती कुमार वाघमारे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी इंदापूर शहर,तसेच तुषार ढगे, सुरज शिंदे, संतोष शिंदे किरण मंडले, संदीप शिंदे, सुरज नरोटे, विजय शिंदे, संदीप नरोटे व इंदापूर शहरातील इतर पदाधिकारी व अनुयायांच्या सह्या आहेत.