
उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा करण्यात आला गौरव…
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :दर्यापूर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री.मनोज लोणारकर यांच्या अध्यक्षतेखाली दि.१ ऑगस्ट २०२३ रोजी अंजनगाव सुर्जी येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये महसूल दिवस साजरा करण्यात आला.दरम्यान उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते उत्कृष्ट काम करणारे महसूल कर्मचारी,पोलीस पाटील,बीएलओ तसेच ऑपरेटर यांचा याप्रसंगी सत्कार घेण्यात आला.
महसूल दिनाच्या पर्वावर आपल्या अध्यक्षीय भाषणात उपविभागीय अधिकारी यांनी म्हटले की,महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या ई-प्रणाली सेवा व त्याची व्याप्ती वाढविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे.तसेच या महसूल सप्ताहामध्ये संबंधित मंडळ अधिकारी,तलाठी यांनी ई-पिक पाहणी बाबत गावोगावी जाऊन शाळा,महाविद्यालयातील मुलांना ट्रेनिंग देण्याच्या सूचना यावेळी दिल्या.
या महसूल दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष दर्यापूर उपविभागीय अधिकारी श्री मनोज लोणारकर,प्रभारी तहसीलदार श्री.रवींद्र काळे,नायब तहसीलदार श्री.विजय भगत,नायब तहसीलदार श्री.अविनाश पोटदुखे,पुरवठा निरीक्षक अधिकारी श्री.रामाघरे उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणामध्ये महसूल सप्ताह बाबत मार्गदर्शन प्रभारी तहसीलदार श्री.रवींद्र काळे यांनी केले.तर संचालन श्री.राजकुमार गवई तलाठी खेलबाबूजी यांनी केले.
*गौरवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची सूची*
उत्कृष्ट अव्वल कारकून राहुल चव्हाण,उत्कृष्ट मंडळ अधिकारी अनिल केदार कापूस (कापुसतळणी),उत्कृष्ट तलाठी आकांक्षा ढोके (निमखेड बाजार),उत्कृष्ट महसूल सहाय्यक रोशन महानकर,७/१२ संगणकीकरण उल्लेखनीय काम परीक्षित गोस्वामी, अंजनगाव सुर्जी तालुका अंतर्गत प्रथम आयएसओ नामांकन प्राप्त केल्याबाबत राजकुमार गवई (तलाठी खेलबाबूजी),नैसर्गिक आपत्ती कामाबाबत ज्ञानेश्वर लकडे,उत्कृष्ट शिपाई संतोष भारसाकळे,उत्कृष्ट कोतवाल प्रेमानंद मेहरे (कसबेगव्हाण),पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी अंतर्गत उत्कृष्ट कामकाजाबाबत राहुल सावरकर (लखाड),पोलीस स्टेशन रहिमापुर चिंचोली अंतर्गत उत्कृष्ट कामकाजाबाबत सौ.वंदना पाथरे (रत्नापूर,पोही),पोलीस स्टेशन खल्लार अंतर्गत उत्कृष्ट कामकाजाबाबत लक्ष्मीकांत मेहकरे (कसबेगव्हाण) या सूचीनुसार कर्मचाऱ्यांचे तहसील कार्यालय अंजनगाव सुर्जी मार्फत दर्यापूर उपविभागीय अधिकारी श्री.मनोज लोणारकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.