
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
लोहा : पानभोसी येथील नेताजी सुभाषचंद्र माध्यमीक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साक्षी राजु ताटे ही विद्यार्थिनी NMMS स्काॅलरशीप साठी पाञ ठरली आहे. तसेच संजीवनी दयानंद ताटे व श्रेया गोविंद वरपडे या दोन्ही विद्यार्थ्यांनी सारथी स्काॅलरशीप साठी पाञ ठरल्यामुळे शाळेसह गावांत पण या तीन हि विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमीक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र भोसीकर यांनी या तीनही गुणवंत विद्यार्थ्यांनींचा सत्कार करून त्याचे कौतुक केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .