
दैनिक चालू वार्ता
छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधि अन्वर कादरी
महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने आज एन सहा मथुरा नगर सिडको भागात कारवाई करण्यात आली.
आज मथुरा नगर येथील 15 मीटर रस्तेवरील अतिक्रमणे काढण्यात आली. सदर रस्त्यावर नागरिकांनी त्यांच्या घरापासून पुढे दहा ते बारा फूट अतिक्रमण केल्यामुळे रस्ता लहान झाला होता.नागरिकांनी घरासमोर दोन ते अडीच फूट ओटे बांधले होते.तर काहींनी घरासमोर लोखंडी जाळी लावून किराणा दुकान, जनरल स्टोअर , शॉपी अशा विविध स्वरूपाचे रस्त्यावर अतिक्रमण केले होते.मथुरा नगर ते सरळ पुढे अविष्कार चौक सिद्धार्थ चौक या ठिकाणी हा रस्ता मिळतो.
या वर्दळीच्या रस्त्यावर लहान-मोठे अपघात होत असतात आणि वाहतुकीस कोंडी होते. पुढे हा रस्ता आझाद चौकाला मिळतो या रस्त्यावर मंगल कार्यालय व शाळा सुद्धा आहे.मंगल कार्यालय मुळे लग्नाच्या वेळेस सर्व गाड्या रस्त्यावर उभे राहिल्या मुळे नेहमी वाहतूक कोंडी होते.
आता बारा फुटाचे अतिक्रमण काढल्याने हा रस्ता मोकळा झाला आहे. सर्व बांधकाम अतिक्रमणे जेसीबीच्या साहाय्याने निष्कर्षित करण्यात आली तर काही नागरिकांनी आपले जीने व वरचे पत्रे स्वतःहून काढण्यास सुरुवात केली. सुरुवातीला काही सामाजिक कार्यकर्ते यांनी महिला महिला मंडळ समवेत कारवाईला विरोध केला परंतु उप आयुक्त विभाग सविता सोनवणे आणि नगर रचना विभागाच्या कनिष्ठ अभियंता पूजा भोगे यांनी या महिलांशी चर्चा केली व त्यांचे अडचणी जाणून घेतल्या. व कारवाईस सहकार्य करण्याचे आवाहन केले.यानंतर नागरिकांचा विरोध मावळ्ल्या नंतर आज दिवसभरात एकूण 13 अतिक्रमण धारका विरुद्ध कारवाई करण्यात आली. तर दोन नागरिकांनी अतिक्रमण स्वतः काढून घेतले .याशिवाय या भागात परिसरातील नागरिकांनी पार्किंग ची सुविधा नसल्याने आपली चारचाकी वाहने उभे केले होते. सबधितांना आपली वाहने काढण्यास सांगण्यात आले त्यामुळे सदरील रस्ता अजून मोठा दिसत आहे.तसेच आझाद चौक ते बजरंग चौक या १२ ते १५ मीटर रस्त्यावर मार्किंग करण्यात आली आहे.
सदर कारवाई मा. प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी , उपायुक्त सविता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली इमारत निरक्षक सय्यद जमशेद, रामेश्वर सुरासे सिडकोच्या मीनल खिल्लारे, नगर रचना विभाग कनिष्ठ अभियंता पूजा भोगे, मजूर व इतर कर्मचारी यांनी कारवाईत सहभाग घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.