
करडखेड-मरखेल रस्त्याच्या कामाला झाली सुरूवात…
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर- भारत राष्ट्र समितीच्या कैलास येसगे कावळगावकर यांच्या संकल्पनेतून मागच्या आठवड्यात करडखेड-मरखेल रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बेशरम लावून अनोखे आंदोलन करण्यात आले. या अनोख्या आंदोलनाची सर्वच प्रसार माध्यमांनी दखल विशेष घेतली. कैलास येसगे यांनी मा. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत पाठपुरावा केला. जिल्हाधिकारी यांनी याबाबत सकारात्मकता दाखवत तातडीने संबंधित अधिकारी व गुत्तेदार यांना आदेशान्वित केले. त्यानुसार कालपासून प्रत्यक्ष रस्ता दुरूस्तीच्या कामाला सुरूवातही झाली. प्रवासी व सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत त्रासदायक बनलेल्या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम तात्काळ सूरू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी कैलास येसगे कावळगावकर व त्यांच्या टीमचे कौतुक करून आनंद व्यक्त केला आहे.