
दै.चालु वार्ता
परांडा प्रतिनिधी धनंजय गोफणे
परंडा- शहारा मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अति उत्साहात साजरी करण्यात आली आपल्या धारदार लेखनीतून असंख्य कथा,कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या, वग लिहिणारे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात सामाजिक, राजकीय प्रश्नाविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ गोवा मुक्ती संग्राम या चळवळीमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान अतिशय महत्त्वाचे आहे.
१आगस्ट २०२३ वार मंगळवार
सकाळी १० वाजता गटविकास अधिकारी श्री संतोष नागटिळक व श्री निलेश बोंबलेसाहेब,एस.बी.आय. शाखा व्यवस्थापक परंडा श्री अमोद भुजबळ पोलीस निरीक्षक परंडा यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले
लोक शाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०३वी जयंती यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले
महाराष्ट्र नवनिर्माण सेना परंडा शहर अध्यक्ष नवनाथ कसबे, शाखा अध्यक्ष अनिल दनाने, लक्ष्मीकांत बनसोडे पुढाकार घेऊन साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त शहरातील विविध शाळेतील सर्व गोरगरीब अनाथ निराधार मुलांना शैक्षणिक साहित्य संपूर्ण संच यासोबत वृक्षरोप भेट देऊन झाडे जगवा झाडे लावा हा संदेश दिला.
जयंती कमिटी तर्फे श्री कु.यश परेश कोयले या विद्यार्थ्यांने इयत्ता 10 वी मध्ये 99.80 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असल्यामुळे त्याचा फेटा शाल व संपूर्ण पोशाख भेट देऊन जयंती कमिटीने सन्मान सत्कार केला..
जि.प.प्रशाळा परंडा इंदिरा वस्ती शाळा परंडा जि.प.कन्या.उच्च प्राथमिक शाळा परंडा जि.प.कन्या प्रशाळा परंडा
महात्मा गांधी विद्यालय परंडा
सरस्वती प्राथमिक शाळा परंडा
प्रेरणा हायस्कूल परंडा
शिक्षण महर्षी श्री राम.गे.शिंदे महाविद्यालय परंडा
इ. शाळेतील व महाविद्यालयीन विद्यार्थी असलेले निराधार मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, यासोबत चहा- बिस्किटे व नाष्टा इत्यादी जयंती कमिटीच्या वतीने सोय करण्यात आली होती.
यावेळी धाराशिव मनसे जिल्हाध्यक्ष आबासाहेब ढवळे तालुका अध्यक्ष सुरेश पाटील जिल्हा सरचिटणीस नागेश मोरे विद्यार्थी सेना अजित नसते तालुका उपाध्यक्ष रोहित टिकोरे शहर उपाध्यक्ष बाळासाहेब कांबळे वाहतूक सेना रमेश नाईक नवरे
छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्राणजीत गवंडीराहुल श़कर बनसोडे ज्येष्ठ समाजसेवक पोपटी गटकुळ, ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक लेखक श्री तु.दा.गंगावणे, युवा सेना कुणाल जाधव, सोमनाथ बप्पा साबळे,माजी नगराध्यक्ष नासीर शहाबर्फीवाले वंचित बहूजन आघाडी जिल्हासचिव धनंजय सोनटक्के शहर अध्यक्ष किरण बनसोडे मोहनराव बसोडे, तानाजी जाधव,लहुजी शक्ती सेना परंडा तालुका अध्यक्ष लक्ष्मण चव्हाण नगरसेवक रत्नकांत शिंदे,
समाजिक कार्यक्रते तानाजी शिंदे, माजी सरणवाडी अर्जून जाधव
केंद्र प्रमुख परंडा महादेव विटकर , महात्मा गांधी विद्यालय परंडा घाडगे सर मुख्याध्यापक शिक्षक श्री बबन गवळी सर, शिंदे सर, खोतसर, लांडगे सर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
जयंती कमिटीचे सोमनाथ कसबे,सुनिल दनाने, आनंद दनाने, विशाल बनसोडे, दीपक चव्हाण, संदीपान कांबळे, दादाराव भिसे,अभय कुलकर्णी, भीमराज शिंदे, अंगद हेळकर , नितीन कसबे, सचिन कसबे, रोहित कसबे, मोहीत कसबे,इत्यादी आयोजकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.