दैनिक चालू वार्ता
कंधार ग्रामीण प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड :- अभिनव चित्रशाळा कला शिक्षण संस्था संचालित, कलामहर्षी त्र्यंबक वसेकर चित्रकला महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्ष 2022-2023 चा महाराष्ट्र शासनामार्फत असणाऱ्या शासकिय उच्चकला परिक्षा ए.टी.डी. द्वितीय वर्षाचा निकाल १००% टक्के लागला आहे. या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष श्री फुलारी डी.व्ही. सर व कार्यवाह श्री.जोशी के.डी.सर व सदस्य श्री कुरुडे एम.पी. सर यांनी केले आहे.या परिक्षेत महाविद्यालयातून प्रथम व प्रथम श्रेणीत 1263 गुण व 63.15% गुण मिळवणारी कु.कऱ्हाळे रिद्धीका रमेशराव तर या महाविद्यालयातून कु.पवार तनश्री मोहन हिने 1226 गुण व 61.30% घेऊन प्रथम श्रेणीत द्वितीय येण्याचा मान मिळवला आहे. तसेच द्वितीय श्रेणीत कु. शिंदे श्रद्धा, हनमंते राष्ट्रपाल, पांचाळ यशवंत, कु.वाडगुरे साक्षी,कु.पांचाळ सत्वशिला, कु.कुरुडे शीतल, कु.भुसारे मयुरी, कु.भगवती झरकर हे उत्तीर्ण झाले आहेत. त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीरवींद्र कांबळे सर व श्री. प्रा. श्री. श्रीनिवास आरदवाड सर यांनी केले. तसेच चित्रकलेमध्ये आवड असणाऱ्या व त्यातच करियर करणाऱ्या १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी २०२३-२४ मध्ये एटीडी प्रथम वर्षात प्रवेश घेऊन आवड हेच करिकर करण्याचे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य श्री. रविंद्र कांबळे सर यांनी केले आहे.
