
जालना प्रतिनिधी आकाश माने
जालना : शहरातील लक्ष्मीनारायणपुरा परिसरात राहणाऱ्या भाग्यश्री चिप्पावार या २९ वर्षीय महिलेने पती आणि सासूच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नातेवाईकांच्या तक्रारीवरून पती राजेश व सासू गंगाबाई यांच्या विरुद्ध कदीम जालना पोलिस ठाण्यात छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील भाग्यश्री हिचा विवाह काही वर्षापूर्वी जालन्यातील लक्ष्मीनारायणपुरा परिसरात राहणाऱ्या राजेश सत्यकुमार चिप्पावार ह्याच्याशी झाला होता. लग्नाला काही दिवस झाल्यानंतर पती राजेश आणि सासू गंगाबाई चिप्पावार हे दोघेही भाग्यश्रीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेऊन गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने त्रास देत होते. ती मोबाईलवर वारंवार बाहेरील अज्ञात व्यक्तीशी बोलते असा आरोप करत तिच्याजवळ असलेला मोबाईल हिसाकावून घेत तिचा छळ करत होते.
*बाळ दुसऱ्याचे असल्याचा आरोप* *
दरम्यानच्या काळात भाग्यश्री ही गरोदर असल्याने तीने बाळाला जन्म दिला. यानंतर हा त्रास वाढत जाऊन तिने जन्म दिलेले बाळ हे माझ्या मुलाचे नसून हे मुलं बाहेर सुरु असलेल्या लफड्यातून झाले आहे; असा गंभीर आरोप नेहमीचं सासू करत होती. सासू आणि पती राजेश तीला मारहाण करत असल्याचा आरोप भाग्यश्री चिप्पावार यांचे भाऊ गणेश उपलांचेवार यांनी केला आहे. तसेच त्यांच्या वाढत गेलेल्या छळाला कंटाळून अखेर भाग्यश्रीने गळफास घेऊन आत्महत्या केली केली असल्याची तक्रार भाग्यश्रीच्या भावाने दिली आहे.
पती सासूला अटक…
तक्रारीवरून कदीम जालना पोलिसांनी पती आणि सासू विरुद्ध छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल दिला. यावरून पती राजेश आणि सासू गंगाबाई चिप्पावार यांना अटक केलीय. दरम्यान महिलेवर पोलिस बंदोबस्तात जालन्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या प्रकरणी कदीम जालना पोलिस अधिक तपास करत आहे.