
दैनिक चालु वार्ता
म्हसळा प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा नगर पंचायत अस्तित्वात आल्या नंतर मागील सहा वर्षापासून म्हसळा शहर वासियानी नगर पंचायतीचा कार्यभाराची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात एक हाती दिली असता खासदार सुनिल तटकरे,नामदार आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांनी करोडो रुपयांचा निधी मंजुर करून शहरात विकासाची गंगा आणली आहे.म्हसळा नगरात विकास कामांसाठी लागणारा निधीचा ओघ सुरूच आसुन नव्याने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत म्हसळा नगर पंचायतीला प्राप्त झालेल्या दोन मिनी ट्रॅक्टर आणि दोन थ्री व्हीलर ऑटो ट्रीपरचे लोकार्पण महीला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.म्हसळा नगर पंचायतीचे स्वच्छ्ता मोहिमेतील काम अग्रेसर आसुन देश आणि राज्य स्तरावरील अनेक बक्षिस प्राप्त झाले असल्याने नगर पंचायतीचे स्वच्छ मोहिमेत अधिक भर म्हणुन नव्याने मदतीला कचरा विल्हेवाट रहदारीसाठी चार मिनी वाहनांची उपलब्धता करून देण्यात आली आहे.म्हसळा कन्या शाळेच्या प्रांगणात आयोजित छोटे खानी वाहन लोकार्पण सोहळ्यात नामदार आदिती तटकरे यांच्या समावेत सहाय्यक सचिव अमित शेडगे,मुख्याधिकारी विराज लबडे,नगराध्यक्ष असहल कादिरी,उपनगराध्यक्ष संजय दिवेकर,जिल्हा चिटणीस महादेव पाटील,माजी सभापती नाझिम हसवारे,मा.सभापती छाया म्हात्रे,गट नेते संजय कर्णिक,माजी उपनगराध्यक्ष सुनिल शेडगे,युवक अध्यक्ष फैसल गीते,महीला अध्यक्षा सोनल घोले,शगुप्ता जहांगिर,शहर अध्यक्ष रियाज घराडे,रफी घरटकर,किरण पालांडे,महेश घोले,करण गायकवाड,नगरसेविका नौशिन चोगले,सुमैया आमदनी, सरोज म्हशीलकर,मेहजबिन दळवी,नासीर मिठागरे, निकेष कोकचा,समीर काळोखे,सतीश शिगवण,संदीप चाचले,प्रकाश गाणेकर,लहू म्हात्रे,शगुप्ता जहांगीर,मुबीन हूर्जुक,कवी म्हसलाई, सूहेल कोठीवले,इर्शाद धायरेकर,ऋषाली घोसाळकर, यशवंत पवार,शाहनवाज उकये आदी मान्यवर उपस्थित होते.