
दैनिक चालु वार्ता
म्हसळा रायगड प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा – भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सवी वर्षाची सांगता होत असताना म्हसळा तालुक्यात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र दिनाचा ७६ वा वर्धापनदिन सोहळा अत्यंत उत्साही व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.”माझी माती माझा देश”अभियान अंतर्गत”तालुक्यात अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालयात दिनांक १३ ते १५ ऑगस्ट रोजी “आजादी का अमृत महोत्सवा”निमित्ताने अनेक मान्यवरांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.शासन आदेशानुसार विविध राष्ट्र हिताचे आणि सार्वजनिक उपक्रम राबवित असताना खास करून तालुक्यात सर्वत्र पर्यावरण पूरक स्वच्छ्ता मोहिम,वृक्ष लागवडीचे सामुहिक उपक्रम संपन्न झाले.१५ ऑगस्ट रोजी
शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम कन्या शाळेच्या प्रांगणात तहसीलदार समीर घारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून संपन्न झाला या वेळी म्हसळा पोलिस ठाण्याचे वतीने मानवंदना देण्यात आली.म्हसळा पोलिस ठाणे कार्यालयाचे ध्वजारोहण पोलिस निरीक्षक संदीपान सोनवणे यांच्या हस्ते,पंचायत समिती कार्यालयाचा ध्वजारोहण गट विकास अधिकारी बाळासाहेब भोगे यांच्या हस्ते,म्हसळा नगर पंचायतीचा ध्वजारोहण नगराध्यक्ष असहल कादिरी,जिजमाता शिक्षण संस्थेचा ध्वजारोहण माजी सभापती महादेव पाटील,सार्वजनिक वाचनालयात अध्यक्ष संजय खांबेटे यांनी,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मेहता यांनी,न्यु इंग्लिश स्कूलमध्ये चेअरमन समीर बनकर यांनी,बॅ.अंतुले महाविद्यालयाचे ध्वजारोहण चेअरमन फझल हळदे यांनी,अंजुमन हायस्कूल मध्ये चेअरमन नासीर मिठागरे यांनी,प्राथमिक शाळेतील ध्वजारोहण शिक्षण समिती अध्यक्ष शशिकांत उर्फ बाबु शिर्के यांचे हस्ते करण्यात आला.म्हसळा तालुक्यात सर्वत्र शाळा,विद्यालय,ग्राम पंचायत आणि निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.स्वातंत्र दिनाचे औचित्य साधुन म्हसळा पंचायत समिती,जीजामाता शिक्षण संस्थेच्या प्रांगणात गटविकास अधिकारी बालासाहेब भोगे,माजी सभापती महादेव पाटील,जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले.मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी पोलीस निरीक्षक संदीपान सोनावणे,नगराध्यक्ष असहल कादीरी,उपनगराध्यक्ष संजय दिवेकर,महसूल तहसीलदार पाटील,गट नेते संजय कर्णिक, गट नेत्या राखी करंबे,माजी सभापती महादेव पाटील, छाया म्हात्रे,नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक, तालुक्यातील सर्व सन्माननीय मान्यवर व्यक्ती, शासकीय अधिकारी,कर्मचारी,शिक्षक,विध्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी म्हसळा पोलीस ठाण्याच्या विद्यमाने व्यसनाधीनता प्रतिबंध करणे आधारीत पथनाटय सादर करण्यात आले.