
दै.चालु वार्ता
उस्माननगर प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या स्वातंत्र्यादिनानिमित्त उस्माननगर येथील ७५ वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहात स्नेहभेट करून यथोचित सन्मान करून सत्कार करण्यात आला.
यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक वैजनाथ स्वामी , बाबूराव शेकापूरे गुरुजी , विश्वासराव लोखंडे गुरुजी , रामकिशन वारकड गुरुजी ,देविदासराव येवतीकर , नागोराव पाटील घोरबांड , विठ्ठल पाटील घोरबांड ,देवरावजी सोनसळे ,विश्वभंर पाटील घोरबांड ,रामजी भिसे ,सोनाजी भिसे ,हानमतुं बाबळे ,बाबू वड ,रामजी सोनसळे , सोपान भिसे ,पंढरी पाटील काळम ,हुजूरशा फकीर ,वनरक्षक मुंडे , चांदोबा भिसे , धनंजय घोरबांड ,आदीची उपस्थिती होती.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून ७६ वर्ष झाले आहेत.गतवर्षी संपूर्ण देशात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला होता.आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करावा ,त्यांनी पारतंत्र्याचा काळात उद्भवणाऱ्या विविध समस्याचा सामना करीत जिवन जगले. तो काळ इंग्रजांच्या ताब्यात होता.तो कशा प्रकारे भारतीय सैनिकांनी जिंकून घेतला. याचे साक्षीदार ज्येष्ठ नागरिक आहेत .त्यांचा या भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करावा , जुन्या आठवणींना उजाळा देवून अनुभव आणि विरंगुळा, मुक्त संवाद साधला गेला असा पत्रकार संघाचा मानस होता.असे आपल्या प्रस्ताविकातून विशद केले.त्यानंतर ज्येष्ठ नागरिक बाबूराव शेकापूरे गुरुजी यांनी , इंग्रज त्याकाळात अन्य,आत्याचार कशा प्रकारे करीत होते .या विषयी इतिहास सांगून भारतीय सैनिकांचे कौतुक केले.त्यानंतर देवरवजी सोनसळे यांनी सुध्दा इतिहास सांगितला.यावेळी प्रत्येक नागरिकांनी अनुभव सांगितले. या पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे ज्येष्ठ नागरिकांनी कौतुक करून भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या परस्परांना शुभेच्छा दिल्या.यावेळी उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने येथील सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक विश्वासराव लोखंडे गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वाच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन अभिष्ठचिंतन केले. सर्व प्रथम पत्रकार संघाचे सचिव प्रदीप देशमुख व उपाध्यक्ष माणिक भिसे यांनी सर्व उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून सत्कार करण्यात आला.यावेळी सुर्यकांत मालीपाटील ,लक्ष्मण भिसे , लक्ष्मण कांबळे , यांनी सत्कार केला.यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी फराळाचा आस्वाद घेतला.शाश्वत लोखंडे ,परिक्षित लोखंडे यांनी परिश्रम घेतले.गावातील सामाजिक कार्यकर्ते , नागरिक उपस्थित होते.सर्वाचे आभार सुर्यकांत मालीपाटील यांनी मानले.