
दै.चालु वार्ता
अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके
महाराष्ट्रातील प्रसिद्ध सिनेमैटोग्राफर अमोल मरकड यांचे मार्गदर्शन
फोटोग्राफी क्षेत्रातील अगोदरची परिस्थिती व आताची परिस्थिती व येणाऱ्या काळातील आव्हाने यासाठी फोटोग्राफरने काय तयारी ठेवली पाहिजे, यावर महाराष्ट्रातील प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर अमोल मरकड यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त अंबड येथील झंवर मंगल कार्यालय येथे दि १६ ऑगस्ट बुधवार रोजी अंबड तालुका फोटोग्राफर असोशिएशन च्या वतीने नियोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी उद्घाटक म्हणून उप पोलीस अधीक्षक चैतन्य कदम तर प्रमुख पाहुणे म्हणून द्वारकादास जाधव,गोवर्धन भोरे,ओमप्रकाश उबाळे,यांच्यासह तालुक्यातील अनेक फोटोग्राफर उपस्थित होते.या कार्यशाळेचे आयोजन अंबड तालुका फोटोग्राफर असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी संतोष शिनगारे,अरुन भवर ,सुभाष खरात विठ्ठल वाडेकर,जावेद शेख,हनुमान कवडे,एकनाथ घायाळ,अनिल काळे ,किशोर मुर्तडकर,गणेश वाघ,बळीराम वाघ,सैफान फारूकी, नामदेव निंबाळकर ,महेश भापकर,विशाल टापरे,कुनाल साखरे,बाबु राक्षे,शाम कवडे,नवनाथ जराड…