
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधीसंतोष ज्ञानोबा भसमपुरे
लातूर/अहमदपूर:-घनकचरा व्यवस्थापन आणि शोषखड्डा यासाठी अहमदपूर तालुक्यात राबवली जात असून सदर योजनेचा अंतर्गत मौजे धसवाडी येथे जवळपास ११ लाख रुपयांचे काम झाले असून सदर काम निष्कृष्ट दर्जाचे झाले आहे.
शासकीय योजना ही लोकांच्या हिताची कमी आणि काम करणाऱ्यांच्या फायद्याची जास्त ठरताना दिसून येत आहे .या योजनेत करण्यात आलेल्या कामात शोष खड्ड्यांची उंची ही जमिनीच्या वर आलेली असून काही शोषखडडयावर स्लॅब टाकण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. पंचायत समितीच्या अंतर्गत होणाऱ्या या कामाची चौकशी गटविकास अधिकारी करतील का ? आणि झालेल्या कामाच्या दर्जात सुधारणा करण्याच्या सूचना करतील का हे पाहणे महत्वाचे ठरेल .जनतेला केंद्रस्थानी ठेवून समाजपयोगी कामात जर अशी निष्कृष्टता येत असेल तर शासनाच्या पैशाचा कचऱ्यासारखा वापर होत आहे असे मानले तर ते चुकीचे ठरणार नाही अशी अवस्था आहे.