
दैनिक चालु वार्ता
ग्रामीण प्रतिनिधी माणिक सुर्यवंशी…
15 जून रोजी समस्त गावकरी मंडळी खानापूर च्या वतीने शाळेस इंग्रजी विषया च्या रिक्त पदाच्या संदर्भात “कुलूप ठोको” आंदोलन केले होते. यावेळी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्याकडून दोन महिन्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. अद्यापही रिक्त पदा संदर्भात कसलीच हालचाल न झाल्याने व 15 ऑगस्ट रोजी सदरची डेडलाईन संपल्याने विद्यार्थ्याचे पुढील शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मा.जिल्हाधिकारी साहेब, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शिक्षण अधिकारी यांची समस्त गावकऱ्यांनी भेट घेऊन निवेदन देण्यात आले. पण अद्यापही यावर कुठलाच ठोस निर्णय न घेतल्याने दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी इंग्रजी विषयाच्या रिक्त पदासंदर्भात समस्त गावकरी मंडळी खानापूरच्या वतीने शाळेला “कुलूप ठोको” आंदोलन करण्यात येणार आहे.
यापूर्वी 23 मे रोजी मा.आमदार जितेश अंतापुरकर यांची गावकऱ्यांच्या वतीने भेट घेण्यात आली होती.व इंग्रजी विषयाच्या रिक्त पदा संदर्भात निवेदन देण्यात आले होते.
5 जून 2023 रोजी मा. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांची भेट घेऊन रिक्तपदा संदर्भात निवेदन देण्यात आले होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून अद्यापही कुठलीच ठोस कार्यवाही करण्यात आली नाही व रिक्त पद भरण्यात आले नाही.