
विजेच्या धक्क्याने म्हैशीचा जागीच मृत्यू…
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड / लोहा : – नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील पांगरी येथे शेतामध्ये महावितरणच्या गलाथन कारभारामुळे विजेच्या धक्क्याने म्हैशीचा जागीच मृत्यू झाला आहे.
लोहा तालुक्यात पांगरी शिवारात अनेक ठिकाणी विजेचे पोल वाकडे तिकडे झाले असुन अनेक ठिकाणी विजेच्या तारा लोबकळलेल्या दिसत आहेत. तर बालाजी तुकाराम कोपनर यांच्या गट क्रमांक 63 मध्ये असलेल्या विद्युत वाहिनीच्या पोलवर असलेल्या तनाव्याला चिमणी नसल्याने विज तणाव्यामध्ये उतरल्याने म्हैशीचा जागीच मृत्यू झाला असुन सदरील शेतकऱ्यांची प्रतिक्रिया घेतली असता महावितरणच्या गलाथन कारभारामुळेच म्हैस गतप्राण झाल्याची खंत यावेळी शेतकऱ्यांने व्यत केली .
महावितरणच्या गलाथन गारभाराला तालुक्यात जनता ञासलेली असुन खेड्यात एक वेळेस लाईट गेली तर राञभर येत नसल्याने महावितरणच्या तक्रारीत लक्षणीय वाढ झाली असुन वरीष्ठांनी व राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या गलाथन कारभाराकडे लक्ष द्यावे आशी जनसामान्य जनतेतुन चर्चा ऐकावयास मिळत आहे.