
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे…
नांदेड (देगलूर):परमपूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना हिंदू संस्कृतीतील विविध सणांची माहिती व्हावी. आहाराचे महत्त्व पटावे म्हणून नागपंचमी हा सन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक दमन देगावकर, अभ्यासपूरक मंडळ प्रमुख सुरेखा तोटावार, अभ्यासक्रममंडळ प्रमुख सचिन जाधव व माता- पालक संघ प्रमुख रूपा पांचारे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते नागदेवतेचे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख व मार्गदर्शक रूपा पांचारे यांनी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये विविध सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. आपल्या भारत देश विविध संस्कृतीने नटलेला देश आहे. पृथ्वीवरील सर्व घटक देवतुल्य आहेत त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये सर्वांची व्यक्ती, पक्षी ,प्राणी व वनस्पतींची पूजा केली जाते. शेतकऱ्यांच्या पिकाचे नागराजा रक्षण करतो. म्हणून नागपंचमी दिवशी नागाची पूजा केली जाते. नागपंचमी हा सण का साजरा केला जातो .झोके का खेळले जातात .मेहंदी लावण्याचे कारण तसेच आजच्या दिवशी मुली माहेरी येतात व आपल्या मैत्रिणींना सुखदुःखाच्या गोष्टी करतात. मनोभावे नागदेवतेची पूजा करतात .नागदेवतेला दूध व लाह्यांचा नैवेद्य दाखवतात असे मार्गदर्शन करण्यात आले.
अध्यक्ष समारोपात विद्यालयाचे मुख्याध्यापकानी आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे.साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे.असे सांगण्यात आले.
यानंतर विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक खेळ खेळले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.