
दै.चालु वार्ता
उस्माननगर ( प्रतिनिधी )
लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- बहुजन रयत परिषद नांदेड च्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नांदेड येथे रविवार दिनांक २७ ऑगस्ट २०२३रोजी सकाळी ११:०० वाजता राजयोग पॅलेस, नमस्कार चौक,नांदेड या ठिकाणी एम.पी.एस. सी.,/ यू.पी.एस.सी./ पी.एस.आय/एस. टी.आय / ए. एस.ओ.व इतर स्पर्धा परीक्षेबाबत राज्यसेवा अकॅडमी पुणेरी पॅटर्न नांदेड चे प्रमुख मार्गदर्शक प्रा.सज्जन कदम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रोफेसर डॉ. माधव बसवंते भूषविणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बहुजन रयत परिषद चे प्रदेशाध्यक्ष श्री.रमेश तात्या गालफाडे, बहुजन रयत परिषद महिला प्रदेशाध्यक्षा अँड. कोमलताई साळुंखे , प्रदेशउपाध्यक्ष प्राध्यापक ना.म. साठे, प्रदेश सचिव मा.ईश्वरजी क्षीरसागर, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवा कांबळे, बहुजन रयत परिषद नांदेड चे जिल्हाध्यक्ष श्री. साहेबराव गुंडीले, मुख्याध्यापक अमोलभाऊ केंद्रे, प्रा.आर.बी.वानखेडे, प्रा.गणेश कदम,प्रा.काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन बहुजन रयत परिषद नांदेड शहराध्यक्ष श्री. भारत कलवले, नांदेड शहर सचिव प्रा. सी.एल.कदम यांनी केले आहे.