
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड :- अगोदरच रस्त्याने वाढत आहे ,वाहनाचा फार मोठा गर्दा ..आता तरी कानाचा मोबाईल काढना रे मर्दा!अशा प्रकारची परिस्थिती सध्या वाहनधारकातून दिसून येत आहे.
सर्वत्रच वाहन व मोबाईल यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी त्याचा कसा ( वापर) उपयोग करावा असा विचार अद्याप पर्येत कोणालाच राहिला नसल्याने दिवसेंदिवस अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.दिवसभर रस्त्याने आपल्या मित्रांना , मैत्रिणींबरोबर , घरच्यांना सुध्दा कामाचे मोबाईलवर बोलणे सुरू असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.वाहनधारक कानाला मोबाईल लावून रस्त्याने आपली वाहने बेजबाबदारीने चालवतात. रस्त्याने वाहन चालवताना दुसरे वाहनधारक आपली वाहने काळजीने चालवतात. परंतु अशा प्रकारच्या काही लोकांकडून बेजबाबदार पणाने वाहने चालवल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढण्याचे संकेत दिसू लागले आहेत. या धावपळीच्या जीवनात वेळ कुणाकडेच नसून वाहन व मोबाईल ही एक अत्यावश्यक सेवा झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे तर काम व वेळ सुध्दा वाया जात नाही. परंतु याचा योग्य वापर चालवताना कमीत कमी रस्त्याच्या कडेला ( बाजूला ) वाहन उभे करून जर मोबाईलवर मोजकच बोलण्यात आले .तर अपघात घडण्याचे प्रमाण कमी होतील .आज तरूण पिढीने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.याचबरोबर नांदेड ते किवळा मार्गे उस्माननगर , कंधार तसेच नांदेड जिल्हातील शहरात व ग्रामीण भागातील रस्त्यावर अनेक उड्डाण टप्पू दोन-दोन,तीन-तीन तरूण वर्ग वाहनावर बसून मोबाईलचा सर्रास वापर करत आहेत.यामुळे अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे.यावर नजर ठेवणे गरजेचे झाले असून अशा वाहनधारकांवर कारवाई करण्याची अत्यंत गरज निर्माण झाली आहे.