
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनीधी माधव गोटमवाड
कागणे कोचिंग क्लासेस, कंधार चे संचालक आंतेश्वर शेषराव कागणे यांची महात्मा ज्योतीराव फुले जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार २०२३ साठी निवड करण्यात आली आहे .
आंतेश्वर शेषराव कागणे यांच्या अद्वितीय कार्याची दखल घेऊन महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद, नांदेड जिल्हा पुरस्कार निवड समितीने त्यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, राष्ट्रीय कार्याची दखल घेवुन त्यांची महात्मा ज्योतीराव फुले जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे.
तसेच निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव यांनी दिले आहे . राष्ट्र निर्मितीच्या कार्यात भविष्यातही आपले मोलाचे योगदान लाभावे ही अपेक्षा व्यक्त करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत .
दि.1 सप्टेंबर २०२३ रोजी कंधार शहरातील महात्मा फुले प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक वाघमारे डी. जी . यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी शिक्षक व पालक उपस्थित होते .
०३ सप्टेंबर २०२३ रोज
रविवार सकाळी ११.३० वाजता कुसुम सभागृह, नांदेड येथे सदरील पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे अशी माहीती प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव यांनी दिली .