
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनीधी माधव गोटमवाड
भारतीय सैन्य दलात विविध संकटांना सामोरे जात देशाचे रक्षण करणारे जवान भारतमातेचे भूषण असतात.
देशरक्षणार्थ विविध ठिकाणी कर्तव्य बजावल्यानंतर सैन्य दलातील सेवानिवृत्त झालेल्या बोरी ( खु.) येथील सैनिकाचे कागने कोचिंग क्लासेस येथे अनोख्या पद्धतीने जल्लोषात स्वागत केले.बोरी ( खू.) येथील जायभाये ज्ञानेश्वर संग्राम हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. 31 ऑगस्ट 2023 रोजी ते बेळगाव येथे सेवानिवृत्त झाले.
जायभाये ज्ञानेश्वर संग्राम यांनी भारतीय सैन्य दलात 17 वर्षे देशातील जम्मू-काश्मीर, राजस्थानसह विविध राज्यात देशसेवा केली आहे. ते ऑगस्ट महिन्यात सैन्यदलातून निवृत्त झाले आहेत. गावाच्या सुपुत्राने देशाचे रक्षण केल्याचा अभिमान असल्याने त्यांचा आदर्श गावातील नव्या उमेदीच्या तरूण पिढीने घ्यायला हवा, या हेतूने तसेच सेवानिवृत्त सैनिकाप्रती आणि भारतीय सैन्यात आपली सेवा देणाऱ्या सैनिकाचा कागणे कोचिंग क्लासेस कंधार येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री. उद्धव चिद्रावार सर (माजी केंद्रप्रमुख), श्री. परमेश्वर कागणे सर, श्री. अंतेश्र्वर कागणे सर, श्री. बेग सर, श्री. विकास चव्हान सर, श्री. माधव गोटमवाड सर, श्री. सचिन गायकवाड सर, श्री. मदन मुंडे सर श्री. बालाजी गुट्टे सर उपस्थित होते.