
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड:- शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम राबणाऱ्या आणि विद्यार्थी विकास करणाऱ्या शिक्षक बांधवांना जाणीवपूर्वक त्रास देऊन आर्थिक लाभाची अपेक्षा व्यक्त होताना दिसून येत आहे. यासाठी अचानक शाळा भेटीच्या नावाखाली चुका शोधणे, लहान-लहान गोष्टी वरून नोटिसा काढणे असे धक्कादायक प्रकार होत आहेत. शिक्षकाना प्रेरणा देण्याऐवजी त्रास देण्याचा प्रकार चालू आहे. गुणवत्ता विकास यासाठी शिक्षक बंधू-भगिनी यांना प्रोत्साहन व ऊर्जा देण्याची गरज आहे. नांदेड जिल्हातील बिलोली, किनवट, माहूर, धर्माबाद, मुखेड, देगलूर हिमायतनगर, तालुके हे भ्रष्टाचाराचे अड्डे* बनत आहेत. सोबतच *शिक्षक बंधू-भगिनींची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक* चालू आहे. यात प्रामुख्याने आस्थापना विभाग, कर्मचारी, अधिकारी यांचा देखील समावेश आहे. काही शिक्षक याची अलिखित बदली, आस्थपना विभागात झालेली नेमणूक कारणीभूत आहे.
मागील ८ महिन्या पासून एकस्तर प्रस्ताव पडून आहेत,७ व्या वेतन आयोगाचे थकीत हफ्ते यांना तर मुहूर्त सापडत नाही, अर्जित रजा मंजुरी साठी राजरोसपणे रक्कम मागली जात आहे, चटोपाध्याय सादर करण्यापासून साधू आवक-जावक नोंदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्थपूर्ण घडामोडी घडत आहेत. आधीच शिक्षक बांधवांना वेगवेगळ्या स्वरूपाचे उपक्रम, चाचण्या, अशैक्षणिक कामे, सर्वेक्षण, यामुळे मेटाकुटीला आला आहे. शिक्षक बांधवांना मूळ कामाऐवजी इतर गोष्टी मध्ये गुंतवल्या पुढाकार दिसून येत आहे गुणवत्तामध्ये तर महाराष्ट्र 2 क्रमांक वरून ७ व्या क्रमांकवर घसरला आहे. त्यात शिक्षकाचे खच्चीकरण व आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात चालू आहे. ५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमापूर्वी नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल कोणती भूमिका घेतात याकडे जिल्ह्यातील सर्व शिक्षकाचे लक्ष लागून आहे.