दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी नादेड( देगलूर): शहरातील अन्नदात्यांच्या सहकार्यामुळे श्रावण मासानिमित्त हनुमान मंदिर देगलूर येथे दररोज दुपारी अन्नदानाचा कार्यक्रम सुरू असून तो श्रावणमास संपेपर्यंत चालणार आहे.
देगलूर शहराच्या मध्यभागी वसलेल्या’क्षुधेलिया अन्न, द्यावे पात्र न विचारून !’ यातुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे देगलूर शहरातील अन्नदात्यांच्या वतीने दररोजअन्नदानाचा कार्यक्रम सुरू आहे. ही अन्नदानसेवा दुपारी यजमानांच्या हस्ते आरती झाल्यानंतर एक वाजल्यापासून सुरू होऊन अन्नदान संपेपर्यंत सुरू राहते. १७ ऑगस्ट पासून श्रावणमास आरंभ झाला असून १३ सप्टेंबर रोजी श्रावण मास संपणार आहे. श्रावण महिन्यात आपल्या हातून अन्नदान घडून पुण्यप्राप्ती व्हावी, या श्रद्धेपोटी देगलूर शहरातील नागरिक स्वयंप्रेरणेने अन्नदान यज्ञात सहभाग घेत आहेत. यात मोगलाजी शिरशेटवार राजेंद्र दाचावार,नंदकुमार कळसकर, योगीराज कुलकर्णी, अशोक पाटील हसनाबादे सुधांशु टेकाळे, संजय महाजन, श्रीकांतमेडेवार, के. मारुती या भाविक भक्तांनी उपवास सेवेसाठी लागणारी सामग्री मंदिरास प्रदानकेली तर मधुकर नारलावार, हिराराम देवासी,
रमेश देवासी, गंगाधर कोलगाणे, गंगाधरराव पाटील नंदगावकर, केतन गुंडावार, , महालक्ष्मी कॉस्मेटिक्स, कन्हैयाइ लेक्ट्रॉनिक्स, बालाजी चुंडुरवार, श्रीनिवास चौधरी, विलास कळसकर, बालाजी पांचाळ,मारोती कंधारे, श्रीहरी येदगीवार, संजय स्वामी,संगमनाथ वट्टमवार, राजेश महाराज, तनुषमुखेडकर, वरद कोनगुलवार, अभिषेक साखरे, बालाजी गरुडकर, रवि जर्दा स्टोअर्स, रेवन आप्पा, रामदास बोधनकर, गणपतराव देशपांडे, स्वामी समर्थ केंद्र, मैनाबाई चिद्रावार, श्रीनिवास रोयलावार, नंदूशेठ शाखावार, भारती शाकंटी आदींनी या अन्नदान यज्ञात आपले योगदान दिले आहे. तसेच कै. हुल्लाजी रोयलावार, कै.बालारामसिंह चौहान,आदी भाविक भक्तांच्या नातेवाईकांनी अन्नदानासाठी आर्थिक सहकार्य करून श्रमदान केले.
