दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी नादेड (देगलूर);येत्या आगामी काळातील लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकी दरम्यान राज्यातील राज्य कर्त्यांना सन २०२४ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीच्या दरम्यान सर्व राजकीय पुढाऱ्यांना जनताच मैदान दाखवेल व राज्यातील राजकीय नेते मंडळीच्या विश्वासाला नक्की तडा बसेल असे सदरच्या जनतेतून बोलल्या जात आहे
महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलकावर करण्यात आलेल्या लाठी चार्जमुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली असल्यामुळे जिकडे पाहवे तिकडे या राज्यातील सरकारचा निषेध केला जात असून आतापर्यंतचे सर्व सरकार हे२०१९ पासून ते आतापर्यंत अनेक सरकार स्थापन झाले सर्वांनी आम्ही मराठा आरक्षण साठी प्रयत्न करतो असे जनतेला भुलताप देऊन मत लाटण्याचा प्रकार केलेला आहे प्रत्येक नेत्यांनी व पक्षाने तळजोडी करून आपली सत्ता कशी येईल व खुर्ची कशी वाचेल या स्वार्थापोटी प्रयत्न करत होते. पण जनतेच्या हितासाठी एकाही सरकारचे धोरण नसल्यामुळे व राज्यामध्ये विविध प्रश्न प्रलंबित असून शेतकरी अतिवृष्टीमुळे हैरान असून त्या गरीब शेतकऱ्याकडे लक्ष देण्यासाठी कोणत्याच पक्षाच्या नेत्यांनी विधिमंडळामध्ये आपला आवाज उठवला नाही फक्त एकूण एकावर शाब्दिक वार करण्यात राजकीय नेते व्यस्त असताना दिसत आहेत .येणाऱ्या लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुकी मध्ये जनता मैदानात दाखवेल अशीच चर्चा ऐकावयास मिळत आहे लोकशाही मार्गाने मराठा समाजाच्या लोकांनी आतापर्यंतच्या सरकारला आरक्षण देण्याच्या संदर्भात गेल्या अनेक वर्षापासून मोर्चे आंदोलने जलसमाधी सारखे कठीण प्रसंग घेऊन मराठा समाज सरकार आरक्षण देईल या आशेने रस्त्यावर उतरत असले तरी बळाचा वापर करून सदरचे आंदोलने हाणून पाडण्याचे आज पर्यंतच्या सरकारने केले आहे मराठा समाजाच्या मागण्या ह्या रास्ता असल्यामुळे सरकारकडे आरक्षण मिळावे म्हणून मागण्या करीत असून त्यांना आरक्षण का ? मिळू नये सरकारने मराठा समाजाला जाहीर सांगावे अशी जनतेतून चर्चा होताना दिसते.
