दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी नांदेड (देगलूर) ;दिनांक 30 ऑगस्ट 2023. रोजी विद्यालयात रक्षाबंधन निमित्ताने बालविवाह निर्मूलन विषयावरती मुलीचे आई-वडिलांना भावनिक पत्राचे लिखाण या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पालकांना मुलीचे शिक्षण महत्वाचे आहे .याची जाणीव करून देण्यासाठी हे पत्र मुलींमार्फत रक्षाबंधनाच्या निमित्ताने पालकांना द्यावे. जेणेकरून पत्रातून मुलीच्या भावना पालकांना समजतील व मुलीच्या शिक्षणास ते प्रेरित होतील. या अनुषंगाने शासनाचा हा उपक्रम राबविण्यात आला.
यात विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनीनी आपल्या पालकांना राखी बांधून पत्र दिले, याचे सर्व छायाचित्र विद्यार्थिनीनी अभ्यास गटावर टाकून रक्षाबंधन सन साजरा केला. याबरोबरच अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांना राखी बांधण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक दमन देगावकर, अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक शिंदे सर, भानुदास शेळके, सुरेखा तोटावार, सविता बेजगमवार, भुताळे सर, अंबुलगेकर सर, माथुरे सर, शेळके मामा उपस्थित होते.
