दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनीधी माधव गोटमवाड
नांदेड / कंधार :-प्रजापिता ब्रम्हकुमारी जी विश्व विद्यालय उपसेवा केंद्र कंधार च्या ब्रम्ह कुमारी ज्योती बहेनजी यांच्या दृष्टीकोनातून पत्रकार व डॉक्टर यांची सेवा भावना लक्षणिय आहे. म्हणून रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी यावर्षी डॉक्टर व पत्रकार मंडळी ची निवड केली. दि.3 सप्टेंबर 2023 रोजी वार रविवार रोजी सायंकाळी 6 वाजता कार्यक्रमास सुरुवात झाली. ज्योती बहेनजी यांनी सुरुवातीला ईश्वरीय ज्ञान दिले. नंतर रक्षाबंधनाचे पुरातन काळापासून चे महत्व, व रक्षा + बंधन तर रक्षा करणे व बंधन का असावेत, सद्भावना दृष्टीकोनातून आकलन करून महत्त्व पटवून दिले. तसेच तिलक का करायला पाहिजे, हेही स्पष्ट केले व माउंट आबू ला जायचे आमंत्रण, तसेच सर्वांना प्रसाद देऊन , 3 दिवसीय मेडिटेशन चे आव्हान केले. या वेळी डॉ. दत्तात्रय गुडमेवार, डाॅ. दिनकर जायभाये ,डॉ. राजेश्वर पांचाळ, डॉ जायभाये ,डॉ. पठाण, डॉ लक्ष्मीकांत पेटकर ,श्री बालाजी गुरसुडकर, पत्रकार सौ. उज्वला बालाजीराव गुरसुडकर, शंकर, लक्ष्मण घोरपडे यांचा सहभाग होता कार्यक्रमांचे आयोजनासाठी परिश्रमाने कार्यरत बिके ज्योती बहेनजी, सतिश भाई निकम, माता सिमा बहेनजी, संगीत माता, सृष्टी, श्रद्धा,पार्थ, साईनाथ, सत्यम शिवप्रसाद, आदींचा सहभाग होता……
