दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनीधी माधव गोटमवाड
नांदेड / कंधार :- येथील गटशिक्षणाधिकारी बाळाजी शिंदे यांनी शेकापूर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास सोमवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा ग्रंथ देऊन संस्थेचे सचिव शिवाजीराव पाटील केंद्रे, प्राचार्य मोतीराम केंद्रे ,पर्यवेक्षक व्यंकट पुरमवार व सर्व शिक्षकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना वाटप करत असताना त्यांनी तपासणी केली व आहाराची चव घेऊन समाधान व्यक्त केले. याप्रसंगी विद्यार्थी व सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
