
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी मंठा/ सुरेश ज्ञा. दवणे…
जालना मंठा:- तालुक्यातील गेवराई
येथे मराठा आंदोलकांनी आक्रमक होत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढुन तीव्र संताप व्यक्त केला. यापुढे नो आरक्षण नो वोट अशी घोषणाबाजी केली. दोन दिवसांत ओबिसीतुन कुणबी
मराठा प्रवर्गातुन आरक्षण न दिल्यास २०२४ मध्ये सरकारची सत्ता उलथून टाकु असा इशारा दिला. त्या वेळी गावाचे ग्रामस्थ
शकडोच्या संखेने उपस्थित होते. गेवराई येथील हनुमान मंदिर येथुन गावातील प्रवेशद्वारावर प्रतिकात्मक अंत्ययात्रेचे दहन करण्यात आले. जिल्यातील आंतरवाला
सराटी येथून मराठा आरक्षणाचा भडका उडाला आहे पोलिसांनी केलेल्या लाठीहल्यामुळे मराठा समाजात सरकार विषयी संतप्त दिसत आहे. गावातुन तिरडी मडके अन् डफडे वाजवत हजारो आंदोलकांनी टरबुज्या. गद्दार मुतऱ्या अशा घोषणा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढुन जोरदार घोषणाबाजी करून संपुर्ण गाव दणाणुन सोडले होते ग्रामस्थाच्या वतिने आंदोलनास पाठिंबाचे पत्र दिले या पुढे मराठा समाजाची मते हवी तर ओबिसी प्रवर्गातुन कुणबी मराठा म्हणुन आरक्षण द्यावे. नसता येणाऱ्या २०२४ च्या निवडनुकीत मराठा समाज बांधव या सरकारची अंतयात्रा काढुन खुर्ची उलथुन टाकतील अशी संतप्त भावना गावातील सकल मराठा समाजातील तरुणांनी व्यक्त केली.