
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी नादेड (देगलूर);देगलूर न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ३५१ प्रकरणे निकाली काढून तब्बल ४१ लाख चाळीस हजार ६०३ रुपयांची विक्रमी वसुली करण्यात आली. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा समितीच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले.
दिवाणी व फौजदारी न्यायालय, देगलूर येथे आयोजित या शिबिरातप्रथमवर्ग न्यायाधीश श्री. अमितसिंह प्रकरणांमध्ये मोहने यांच्या अध्यक्षतेखाली पॅनल तयार करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोडपात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३५१ प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून ४१ लाख ४० हजार सहाशे तीन रुपयांची विक्रमी वसुली झाली.
दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणांसह विविध राष्ट्रीयकृत व सहकारी बँका, फायनान्स, बीएसएनएल, पंचायत विभाग, व इतर वित्तीय संस्थांच्या दाखलपूर्वतडजोडीतून निकाली काढण्यात आली. गुन्हा कबुली, समेट व अन्य प्रकारच्या समेटान्वये ३८ फौजदारी स्वरूपाची प्रकरणे निकाली काढण्यात येऊन, त्यातून रक्कम वसुली करण्यात आली. तर दिवाणी स्वरूपाच्या दाखल प्रकरणांत ३१३ प्रकरणांत तडजोड करून प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. या विशेष लोकअदालतीमध्ये दिवाणी व फौजदारी न्यायाधीश अमितसिंह मोहने यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विधिज्ञ, कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.