
दैनिक चालु वार्ता
म्हसळा प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा – म्हसळ्यातील सामाजिक क्षेत्राशी निगडित निर्भीड व अभ्यासू पत्रकार म्हणून प्रचित असलेले जिजामाता शिक्षण संस्थेचे सचिव अशोक काते यांची रायगड जिल्हा शांतता समितीच्या अशासकीय सदस्यपदी खासदार सुनील तटकरे यांच्या शिफारशीने नेमणूक करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तथा संस्थापक महादेवराव पाटील, संचालक मनोज नाकती, दिलीप कांबळे, ऍड. मुकेश पाटील, नवनीतशेठ पारेख, लक्ष्मण कांबळे, राजेंद्र गोरीवले, बाळकृष्ण पाटील जिजामाता मराठी माध्यमिक शाळेचे मुख्याद्यापक संदिप कांबळेकर शाळेचे शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी या निवडी बद्दल श्री काते यांचे अभिनंदन करून शुभेच्या दिल्या.