
रस्त्यावर टायर पेटवले; पोलीस घटनास्थळी दाखल…
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी नांदेड ( देगलूर):मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज सोमवारी भल्या सकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेड – हैदराबाद रोडवर चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. नायगाव तालुक्यातील कृष्णूर, गगनबीड आणि पळसगाव या तिन्ही ठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरु आहे. रस्त्यावर टायर जाळून आणि लाकडं पेटवून तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
सकल मराठा समाजाच्या वतीने आज नांदेड हैदराबाद मार्गावर अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. श्रावण सोमवार असल्याने गगनबीड येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची वर्दळ होती. भल्या सकाळी नोकरीला जाणाऱ्यांची संख्या ही लक्षणे होती मात्र चक्काजाम आंदोलन करण्यात आल्याने भाविक आणि नोकर वर्ग अडकून पडला आहे. वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे अनेक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. कुंटूर आणि नायगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली आहे.