
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा. दवणे..
जालना (मंठा):तालुक्यातील केहाळ वडगाव येथील सर्व ग्रामस्थ एकत्र येत मराठा आंदोलनाला पाठिंबा देवून संपूर्ण गाव मनोज जरांगे पाटिल यांच्या आंदोलनाला संपूर्ण साथ देत असल्याचे तसेच पूर्ण केहाळ वडगावाच्या एकीचे दर्शन गावकऱ्यांनी दाखवून दिले.
सध्या अंतरवाला सराटी येथे मनोज जरांगे पाटिल हे स्वतः शासनाने मराठा आरक्षण द्यावे या मागणीसाठी उपोषणास बसले आहेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वडरगाव येथील संपूर्ण गाव एकवटला असून मराठा आरक्षणाची मागणी मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही असा येथील नागरिकांनी निर्णय घेतला असून गावातील विलास दवणे, ओंकार दवणे,सतीश दवणे, देविदास आवचार, धनंजय दवणे, गजानन दवणे, यशवंत बनसोडे पंकज दवणे, सोमेश्वर दवणे,गजानन दवणे इत्यादींनी अंतरवाली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना येथे जावून मनोज जरांगे पाटिल यांच्या आमरण उपोषणास ग्रामस्थ यांच्या वतीने जाहिर पाठिंबा देवून गावच्या एकीचे दर्शन दिले तसेच त्या संबंधीचे निवेदन मनोज जरांगे पाटिल यांच्या मराठा आरक्षणाच्या उपोषणाला जाहिर पाठिंबा दिला जरांगे पाटिल आपण लढत रहा आम्ही तुमच्या पाठिशी आहोत असे आश्वासन त्यांना दिले…