
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा. दवणे जालना (मंठा)
येणाऱ्या गणेशोत्सव २०२३ करीता परवानगीसाठी पोलीस विभागाकडून गणेश मंडळांसाठी वेबसाईटवर सुविधा उपलब्ध केलेली आहे. तरी पोलीस विभागाकडून जाहीर केलेल्या वेबसाईटवर जाऊन गणेशोत्सव मंडळांनी सिटीझन पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. असे अवाहन मंठा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारोती खेडकर यांनी केले आहे.आवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेश उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. गणेश उत्सवात गणेश स्थापनेपासून विसर्जन मिरवणूक पर्यंत अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. यासाठी पोलीस प्रशासनाकडून परवानगी घेणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांना सोप्या पद्धतीने परवानगी घेता यावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने ऑनलाईन परवानगी देण्यासाठी सिटीझन पोर्टलवर वेबसाईट सुरू करण्यात आली आहे.
तरी आगामी काळात होणार्या गणेशोत्सवाच्या अनुषगांने गणपती स्थापना, मिरवणुक कार्यक्रमासाठी गणपती मंडळे व इतर नागरीक हे परवानगीसाठी सिटीझन पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याकरिता (h t t p S citizen.mahapolice.gov.i), (www.mahapolice.maharashtra.gov.in) वेबसाईटवर सुविधा उपलब्ध केलेली आहे. तरी या वेबसाईटवर जाऊन गणेश मंडळांनी अर्ज करावेत.संबंधीत पोलीस ठाणेस अर्ज प्राप्त झाल्यानंतर पोलीस अधिकारी व गोपनिय अंमलदार
अर्जाची पडताळणी करुन मंडळांना प्रत्यक्ष पोलीस ठाणेत परवानगी देण्यात येईल.असे आवाहन मंठा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारोती खेडकर यांनी केले आहे.