
कैलास यसगे कावळगावकर…
हजारो शेतकरी सन्मान निधीपासून वंचित…
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी नांदेड (देगलूर):-
तालुक्यातील हजारो शेतकरी आजही पीएम किसान सन्मान निधीपासून वंचित आहेत. छोट्या छोट्या त्रुटींचे कारण सांगून शेतकऱ्यांना या निधीपासून वंचित ठेवले जात आहे. कागदपत्रांची पूर्तता करून शेतकरी अक्षरशः थकून गेला आहे. याबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करणे सुरूच आहे. बोरगाव व परिसरातील शेकडो शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत म्हणून आज शेतकऱ्यांनी कैलास यसगे कावळगावकर यांच्या नेतृत्वाखाली देगलूरचे तहसीलदार मा. राजाभाऊ कदम यांची भेट घेऊन या वंचित शेतकऱ्यांना तात्काळ न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याबाबत निवेदन दिले. माननीय तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क करून लवकरात लवकर त्रुटी दूर करण्याबाबत शब्द दिले. यावेळी बोरगाव मधील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.