
पदयात्रेचे ११ वे वर्ष पदयात्रेत दोन हजार महिला -पुरुषांचा सहभाग…
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी
नांदेड (देगलूर) : दर वर्षाप्रमाणे यावर्षीही तालुक्यातील करडखेड येथील प्राचीन हेमाडपंथी महादेव मंदिराच्या दर्शनासाठी श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी देगलूर ते करडखेड पदयात्रा काढण्यात आली. सदरील पदयात्रा भाजप जिल्हा उपाध्यक्ष संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येते.पदयात्रेचे हे ११ वे वर्ष असून काल सोमवारी सकाळी ८ वाजता बंडयाप्पा मठ संस्थान गांधी चौक येथून पदयात्रेचा शुभारंभ देगलूर-बिलोली मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष साबणे यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजनाने करण्यात आले.यावेळी प्रकाश पाटील बेंबरेकर, बबन पाटील गोजेगावकर, अनिल पाटील खानापूरकर ,अशोक साखरे,शहरातील डॉ.मल्लिकार्जुन रकटे ,डॉ.अमित देगलूरकर ,डॉ. रवींद्र भालके.
डॉ. राहुल माका,डॉ.अवकाश पाटील,शिवानंद स्वामी ,सचिन पाटील कारेगावकर,अरुण पाटील,अशोक गंदपवार,गंगाधर दाऊलवार ,कृउबा चे उपसभापती रवी पाटील, माजी नगरसेवक शैलेश उल्लेवार, सजिव पाटील शाहपुरकर, लहुकुमार मरतोळे, रामदास केरले,उपप्राचार्य उत्तमकुमार कांबळे, कैलास येसगे,अशोक कांबळे, गगाधर दाऊलवार, नारायण पाटील रमतापूरकर, लक्ष्मण मुंगडे ,वैजनाथ मिसे ,संभायाप्पा स्वामी ,चंद्रकांत स्वामी,अशोक डुकरे,विश्वनाथ माळगे, बालाजी ताटे, आदि उपस्थित होते..
दरवर्षी हि पदयात्रा शिवभक्त संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येते. बळीराजाला सुखी ठेवण्यासाठी, शेतकऱ्यांवरील संकट दूर होण्यासाठी सर्व शिवभक्ताकडून पदयात्रेच्या माध्यमातून करडखेडच्या पूर्वारेश्वर महादेवाला साकडे घालण्यात आले.देगलूर ते करडखेड शिवमंदिर पर्यंतचा १५ किमी च्या पदयात्रेत भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी ठिकठिकाणी भाविक भक्तांसाठी उपवासाच्या फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. देगलूर येथे संस्कृती डिजिटल इंग्लिश स्कुल कडून भक्तासाठी केळी चे वाटप करण्यात आले. गुंफा मंदिर येथे केतकी संगमेश्वर फार्मा प्रोडूसर कंपनी यांच्याकडून साबुदाणा खिचडी चे वाटप करण्यात आले. सिद्धेश्वर मंगल कार्यालय येथे शिवा संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोक मजगे यांच्याकडून पाणी आणि चहा ची व्यवस्था केली होती. त्यानंतर होट्टल फाटा येथे डॉ.अमित इप्पतवार यांच्याकडून पदयात्रेत सामील असलेल्या भाविकांसाठी केळीचे वाटप केले.
कारेगाव येथे शिवराज पाटिल,बल्लुर फाटा येथे विशाल पवार,आकाश बिरादार ,कावळगाव येथे धोंडू येसगे व प्रदीप लगडे,बोरगाव येथे बसवंत गोपछडे, डॉ.विनायक मुंडे ,डॉ. कपिल एकलारे ,डॉ.स्वप्नील कद्रेकर,डॉ. सुनील बालुरकर,डॉ.राजकुमार कस्तुरे,डॉ.अमित देगलूरकर, डाॅ.किरण बिरादार, अनुप कोडगीरे, संतोष नारलावार,प्रकाशअप्पा कोटचिरकर आदींकडून पाणी ,चहा,साबुदाणा खिचडी,नाश्ता,फळ इत्यादींचे वाटप करण्यात आले .आज आठवडा भरानंतर पाऊस थांबल्याने भक्तांना त्रास झाला नाही.पदयात्रेत शिव स्तुती गायन-भजन या बरोबर महिला भजन मंडळीचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला .गुरुराज माऊली च्या नामस्मरणात पाऊले टाकत ,टाळ-मृदंगाच्या गजरात व हर -हर महादेव च्या घोषात हि पदयात्रा बंडयाप्पा मठापासून अण्णाभाऊ साठे चौक,देगलूर महाविद्यालय ,होट्टल फाटा,कारेगाव,बल्लूर फाटा,चाकूर फाटा ,कावळगाव ,बोरगाव मार्गे करडखेड येथील पुर्वारेश्वर महादेव मंदिरात दुपारी १ वाजता पोहचली . पश्चात तेथे महादेवाची महा आरती पदयात्रा संयोजक संतोष पाटील व सहभागी शिवभक्तांच्या वतीने करण्यात आली..
पदयात्रेमध्ये शिवभक्तांना त्रास होऊ नये यासाठी देगलूर पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्रीकांत मोरे यांच्या टीमने चोख बंदोबस्त ठेवला. विक्रम सुभाष साबणे यांच्याकडून ऍम्ब्युलन्स सेवा देण्यात आली .तसेच देगलूर महाविद्यालयाच्या एनसीसी पथकातील एकूण ३५ कॅडेट नि पदयात्रेमध्ये सुव्यवस्था, ट्रॅफिक नियंत्रण व स्वच्छता ठेवण्यासाठी विशेष परिश्रम केले.
पदयात्रा यशस्वी करण्यासाठी संयोजक संतोष पाटील,सचिन देशमुख,शाहीर माणिक कोकले,ओमकार अमृतवार ,सोनू मारकवाड,विशाल अमृतवार ,धनाजी जोशी ,रज्जाक धुंदी,गजानन भोकसखेडे,इरवंत कालिंगवार, शिवकुमार पाटील ,भागवत पाटील सोमुरकर,गजानन येवतीकर, दत्ता टोंपे, गजानन राठोड,रमेश राठोड,महिला व पुरुष भजनी मंडळ आदींनी परिश्रम केले…