तालुक्यातील पंधरा हजार लाभार्थी पैसा पासून वंचित,पुरवठा विभागाचे मात्र दुर्लक्ष…
दैनिक चालू वार्ता हिमायतनगर
प्रतिनिधी राम चिंतलवाड
हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबाचे पुरवठा विभागाकडून दिले जाणारे राशन(शिधा) जानेवारी 2023 पासून शासनाने बंद केले असून त्या बदल्यात कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला धान्याऐवजी 150 रुपये या दराप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या बँक खात्यात प्रति महिना पैसे जमा करण्याचा आदेश असतानाही व इतर तालुक्यात शेतकरी कुटुंबातील लाभधारकांना पैसे मिळत असतानाही हिमायतनगर तालुक्यात मात्र अद्याप पर्यंत धान्य बंद करू नये पैसे मिळत नसल्याने तालुक्यातून 15285 लाभधारक शेतकरी वंचित असल्याने संबंधित पुरवठा विभागाच्या गलथान कारभाराबद्दल संताप व्यक्त करीत आहेत.
आठ महिन्यापासून बंद झालेला शेतकरी कुटुंबाचे धान्य, व बँक खात्यामध्ये पैसे जमा होत नसल्यामुळे सणासुदीच्या आणि तोंडावर अनेक कुटुंबातील व्यक्तींना आपले वाईट दिवस काढावे लागत आहेत शासनाने राबवत असलेली ही अन्नपुरवठा योजना हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी कुटुंबाला आठ महिन्यापासून घातक ठरत आहे योजनेचा अन्न व पैसा मिळत नाही तर दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या शेतकऱ्याला कुटुंबासाठी दैनंदिन आहार भागवण्याकरिता धान्य घेण्यासाठी ही पैसे उपलब्ध नसल्यामुळे अनेक कुटुंबावर वाईट वेळ आली आहे.
शासनाच्या नव्या आदेशाप्रमाणे अन्नपुरवठा योजना यामध्ये अंतोदय प्राधान्य शेतकरी आणि अन्नपूर्णा लाभधारकांना धान्याचा लाभ होतो परंतु नव्या आदेशानुसार शेतकरी कुटुंबाचे धान्य जानेवारी 2023 पासून बंद होऊन कुटुंबातील प्रति व्यक्तीला धान्य योजना 150 रुपये या दराप्रमाणे मासिक पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश असताना या योजनेपासून शेतकऱ्याचे मिळणारे धान्य बंद होऊन आठ महिन्याचा कार्यकाळ लोटला असला तरी हिमायतनगर तालुक्यातील 4030, लाभधारकाचे धन्य बंद झाले असले तरी त्या कुटुंबातील 15285 लाभार्थी व्यक्तीचे पैसे मात्र बँक खाते अद्याप जमा झाले नसल्याने लाभधारकातून तालुक्याच्या पुरवठा विभागातील वरिष्ठ कर्मचाऱ्यांबद्दल व्यक्त केला जात आहे.
आठ महिन्यापासून अन्नपुरवठा बंद होऊन बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याच्या प्रक्रियेत पुरवठा विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष घालून वंचित असलेल्या तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना त्यांचा लाभ मिळवून द्यावा अशी ओरड अन्नपुरवठा बंद झालेल्या शेतकरी कुटुंबातील व्यक्तीच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे.