
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी
नांदेड (देगलूर); दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी नगरेश्वर मंदिर देगलूर येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत
महोत्सवा निमित्त तहसील कार्यालय देगलूर यांच्या तर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील ज्ञान सरस्वती इंग्लिश स्कूल देगलूर पूजा पब्लिक स्कूल देगलूर साधना हायस्कूल देगलूर सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय देगलूर गोळणकर गुरुजी माध्यमिक विद्यालय देगलूर माननीय विकास माध्यमिक विद्यालय देगलूर आदी शाळेने सहभाग घेतला होता.
यावेळी पथनाट्य ,मूकनाट्य, देशभक्ती गीते तसेच भरत नाट्यम अशा विविध संस्कृती कला सादर करण्यात आल्या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी चांगल्या प्रकारे परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी कुलदीप जंगम, तहसीलदार राजाभाऊ कदम, बी.डी.ओ. शेखर देशमुख, नायब तहसीलदार संजय नागमवाड, नायब तहसीलदार बालाजी सुरनर, गटशिक्षणाधिकारी तोटरे तसेच सर्व महसूल विभागातील कर्मचारी व शहरातील नागरिक उपस्थित होते…