
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा. दवणे…
जालना (मंठा):-शहरातील विविध ठिकाणी घरफोडीमध्ये एल. ई. डी. टीव्ही चोरी व मोबाईल हरवल्याच्या वेगवेगळ्या तक्रारी
पोलीस ठाणे मंठा येथे मागील काळात दाखल आहेत सदर झालेल्या चोरीच्या अनुशंगाने गोपनीय माहीती व तांत्रिक माहीती हस्तगत करुन चोरी करणारे आरोपींना शोधघेवून अटक करुन वेगवेगळ्या आरोपी कडुन मोबाईल व एल.ई.डी. टिव्ही हस्तगत करण्यात आल्या आहे.
त्यामध्ये तक्रारदार 1) प्रविण बन्सीधर सानप रा. मंठा 2) रामेश्वर आसाराम दुभळकर रा. जाटखेडा 3) बालाजी किसन मोरे रा. मंठा यांचे चोरी झालेले तिन मोबाईल हस्तगत करुन परत करण्यात आले आहेत. तसेच 1) अनिल शिवलिंग जंगम रा. मंठा 2) संदिप रामराव बोराडे रा. मंठा यांचे घरफोडी चोरी झालेले दोन एल.ई.डी टिव्ही हस्तगत करुन परत करण्यात आले आहे. व 1) अमोल सोपान राठोड रा. मंठा 2) उमेश सुभाषराव हारनावळ रा.मंटा 3) खालेद पठाण .रा. मंठा. 4) गणेश महादा टाकरस रा. रायगाव ता.लोणार जि. बुलढाणा यांचे हरवलेले 04 मोबाईल चा शोध घेवून परत करण्यात आले आहेत.
सदर हस्तगत करण्यात आलेले एकुण सात मोबाईल व दोन एल.ई.डी टिव्ही असा एकुण 1,54,000/- रुपयाचा मुद्देमाल आज रोजी मा. श्री. सुरेश बुधवंत उपविभागीय पोलीस अधिकारी, परतुर यांच्या हस्ते मुळ मालकास परत करण्यात आला आहे. सदर मोबाईल व एल.ई.डी. टिव्ही मिळाल्यामुळे तक्रारदार यांनी समाधान व्यक्त करुन पोलीसांचे आभार मानले आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. शैलेश बलकवडे साहेब, पोलीस अधिक्षक, जालना श्री. सुरेश बुधवंत साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, परतुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, सपोनी सोनवळे, पोउपनि शिंदे, पोउपनी राऊत, सपोउपनी सोपान चव्हाण, पोहेकाँ रखमाजी मुंढे, पोहेकाँ राजु राठोड,
पोहेकाँ काळुसे, पोहेकॉ सुक्रे, पोना शाम गायके, पोना मंगेश चौरे, पोकाँ सुनिल इलग, मांगीलाल राठोड, कानबाराव हराळ, संतोष बनकर, विजय जुंबडे, आनंद ढवळे समाधान खाडे, प्रशांत काळे, आकाश राऊत, मनोज काळे, पांडुरंग निंबाळकर, यांनी सदरची कार्यवाही केली आहे.