
अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंबड तालुक्यातील साडेसावंगी येथील लहान लहान मुला मुलींनी भाषणातून त्यांनी आरक्षणाचे महत्त्व सांगून दिले आंतरवाली सराटी येथील साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे या दरम्याने रविवारी साडेसावंगी या गावात सकल मराठा समाज बांधव हजारच्या संख्येने उपस्थित होते या गावातील व पंचक्रोशीतील समाज बांधवांना सहभाग घेतला होता..
आंतरवाली सराटी येथील साखळी उपोषण 40 दिवसाचे नियोजन करण्यात आले आहे त्यासनुसार गोदाकाठी वरील विविध गावातील समाज बांधव उपोषणात सहभागी घेतला होत व आंतरवाली सराटी पासून सुरुवात झाली तर रविवारी अंबड तालुक्यातील साडेसांगवी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने सुरुवात करण्यात आली. तरी रविवारी साडेसावंगी या गावातील महिला युवक शाळेतील लहान लहान मुलं मुली व तसेच ज्येष्ठ नागरिक मराठा समाज बांधवना यात सहभाग नोंदवला…