
दैनिक चालु वार्ता गंगापुर प्रतिनिधि
गंगापूर : पंधरा वर्षांपूर्वी शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल झाल्याने फरार झालेल्या दोन आरोपींना गंगापूर पोलिसांनी वेषांतर करून जेरबंद केले होते. या कारवाईची दखल घेऊन पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी गंगापूर पोलिस ठाण्यातील पथकाचा शुक्रवारी सन्मानपत्र देऊन सत्कार केला.
येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णावर उपचार करू नये म्हणून फेब्रुवारी २००८ मध्ये लाठ्या काठ्यासह डॉक्टरांना शिवीगाळ, दमबाजी व रुग्णालयाची नासधूस केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या परसराम मोरे (वय ४८), राजू मोरे (वय ४२) या दोन फरार आरोपींना गंगापूर पोलिसांनी तब्बल पंधरा वर्षांनंतर ५ सप्टेंबर रोजी वेशांतर करून अटक केली होती.
या कामगिरीबद्दल पोलिस. अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या हस्ते गंगापूर पोलिसांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सदरील सन्मान, पथकातील प्रमुख पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी सर्वांच्या वतीने प्रतिनिधिक स्वरूपात स्विकारला वेळी अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले, शेषराव मोरताले, कडुबा गाडेकर, राहुल पगारे, अमोल कांबळे, अभिजित डहाळे, राहुल वडमारे, मनोज नवले आदी उपस्थित होते…