
मुक्तीसंग्राम दिनी सर्वोत्कृष्ट पूरस्कार सोहळा…
दैनिक चालु वार्ता
वैजापूर प्रतिनिधी भारत पा.सोनवणे
वैजापूर (छत्रपती संभाजीनगर)– महाआवास अभियानांतर्गत विविध योजनेत उत्तम कामगिरी करणाऱ्या तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींना आमदार रमेश बोरनारे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ‘उत्कृष्ट ग्रामपंचायत’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
२० नोव्हेंबर २०२२ ते ५ जुन २०२३ या कालावधीत अमृत महाआवास अभियान राबवण्यात आले. या अभियानात ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजनेत खंडाळा, माळीसागज व हिलालपूर या ग्रामपंचायतींनी उत्तम कामगिरी केली. तसेच राज्य पुरस्कृत शबरी आवास योजना व रमाई आवास योजनेत महालगाव, भिवगाव व लोणी बुद्रुक या ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट कामगिरी केली.
त्यामुळे या ग्रामपंचायतींचा आमदार रमेश बोरनारे यांनी प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. तसेच मधुर व पोखरी गटांमध्ये १६२ घरकुले व जरुळ, सवंदगाव गटांमध्ये १३५ घरकुले पुर्ण झाल्याने ऋषिकेश वाघ व समाधान शेळके यांना आमदारांच्या हस्ते ग्रामीण गृहनिर्माण अभियंता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष साबेर खान, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, जिल्हा बँक संचालक आप्पासाहेब पाटील, बाळासाहेब संचेती, हाजी अकिल शेख, रामहरी पा. जाधव, गटविकास अधिकारी पल्लवी लांडे, राजेंद्र पा.साळुंके, शिवकन्या पवार,प्रकाश पा.मतसागर, गणेश पा.इंगळे, दशरथ बनकर,सहायक गटविकास अधिकारी अमेय पवार याची प्रमुख उपस्थिती होती.