
दैनिक चालू वार्ता
उप संपादक धाराशिव नवनाथ यादव
धाराशिव:( भूम ): तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात रवींद्र हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विजेतेपद पटकावले . त्यांची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे . भूम येथील रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल येथे सोमवार दी १८ रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत रवींद्र हायस्कूलच्या संघाने पाथरूडच्या संघाचा पराभव केला.
या विजयी संघात श्रेयस साठे , सुमित गरड , श्रवण साठे , मोहित माने , यशोदीप कांबळे , पृथ्वीराज रायनवर , हर्षवर्धन गावडे , देवराज येळमकर , साहिल गावडे , गणेश रांधिम , विनायक आहेर या खेळाडूंचा समावेश आहे . यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विभागाचे माजी अधिष्ठाता प्रा डॉ आप्पासाहेब हूंबे , मार्गदर्शक अमर सुपेकर , प्रदीप कांबळे , श्री आरेकर यांच्यासह मान्यवर हजर होते.
या स्पर्धेचे उद्घाटन संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूर चे प्रशिक्षक महेश गावडे , विस्तार अधिकारी अहमद शेख , बाणगंगा हायस्कूलचे मुख्याध्यापक मधुकर लिमकर , कन्या प्रशलेचे मुख्याध्यापक संतोष आघाव , जिल्हा परिषद हायस्कूल भूमचे मुख्याध्यापक तात्याबा कांबळे , श्री गुरुदेव दत्त हायस्कूलचे मुख्याध्यापक दत्तात्रय भालेराव , रायझिंगचे व्यवस्थापक हरीश धायगुडे , हकीम सिद्दीकी , क्रीडा मार्गदर्शक अमर सुपेकर , काकासाहेब पवार यांच्यासह मान्यवर हजर होते .