
लोहा बाजार समितीच्या १८ पैकी १८ जागा जिंकण्यासाठी कामाला लागा – खा. चिखलीकर…
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड / लोहा : –
लोहा तालुक्यातील मौजे सुनेगाव येथे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकी संदर्भात सावरगाव जि.प. गटाची बैठक संपन्न झाली.
यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर होते तर प्रमुख उपस्थिती जिल्हा बँकेचे संचालक तथा भाजपाचे लोहा-कंधार विधानसभा प्रमुख प्रविण पाटील चिखलीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्र. हंसराज पाटील बोरगावकर, बैठकीचे आयोजक तथा माजी जिल्हा परिषद सभापती संजय पाटील कराळे, उपनगराध्यक्ष दत्ता वाले, दिपक पाटील कानवटे, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीचे बळीराजा परिवर्तन पॅनलचे उमेदवार माणिकराव व्यंकटराव चव्हाण ( मुकादम), सुर्यवंशी उध्दव व्यंकटराव, कदम अंकुश निवृती, कराळे गजानन बालाजी, पाटील मारोती कुशबराव , ढगे शंकर गोविंद, ,ढाले कोंडीबा बाबुराव, सोमवारे कविताबाई गणपती, फाजगे रेणुकाबाई प्रल्हादराव, राजुरे विरभद्र शंकरअप्पा, तिडके संतोष नामदेव, शिंदे आनंदा शंकरराव, कदम विजयसिंह पंढरीनाथ, पवार मिलिंद माधवराव, गायकवाड सुभाष शामराव, चव्हाण केशव व्यंकटराव, वटमवार किरण नरहरी, नरवाडे मधुकर विठ्ठलराव
या सर्व उमेदवारांचा सावरगाव सर्कल मधील मतदारांना परीचय करुन देण्यात आला.
तसेच यावेळी माजी जि.प. सभापती संजय पाटील कराळे यांच्यावतीने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा भला मोठा खारिक खोबऱ्याचा हार घालून भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना खा. प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की, कंधार बाजार समितीच्या निवडणूकीत लक्ष घातले नाही पण येथे लक्ष घालावे असे हंसराज पाटील बोरगावकर भाषणात म्हणाले. कंधार बाजार समितीच्या निवडणूकीत ज्याचे डिपाझीट जप्त होयाचे होते त्यांचे ७ उमेदवार निवडून आले आहेत ही फार आश्चर्याची बाब आहे.
लोहा बाजार समिती,लोहा पंचायत समिती गेल्या २० वर्षांपासून आपल्या ताब्यात आहे. लोहा न.पा. ५ वर्ष सोडले तर २५ वर्षांपासून आपल्या ताब्यात आहे.
संजय पाटील कराळे यांचा यांचा आजपर्यंत सन्मान झाला त्यांच्यापेक्षा जास्त सन्मान करुत.
मला पुढच्या पॅनलवाल्यांना सांगा म्हणा त्यांच्या १८ उमेदवारांची ओळख उभे करून दाखवा. उमेदवार कसे आहेत हे त्यांना माहीत नाही हा संशोधनाचा विषय आहे.
मी आपल्या पॅनलचे १८ उमेदवार आपल्या दोन भगनीसह उभे करून ओळखतो.
आपल्याला सर्वाची नाराजी दूर करून निवडणूक जिंकायची आहे.सगळेजण म्हणत आहेत तिकडे काय भाव काढत आहेत त्यांना काय भाव काढायचा आहे ते काढू द्या आपल्याला माणसे जोडायचे आहेत .१८ पैकी १८ उमेदवार निवडून आणायचे आहेत. मी कधीही जातीचा विचार केला नाही रुस्तुम धुळगुंडे यांना ७ वर्ष सभापती केलो,किरण वटमवार यांना नगराध्यक्ष केलो.
माझी हात जोडून विनंती आहे कुणाला फार्म उचलून घेतला म्हणून आपली नाराजी दूर करा थोडीही चूक आपल्याला ५ वर्ष भोगावी लागेल.
हरीहर भोसीकर यांना ही सोबत घेयाचे होते पण ते जमले नाही त्यांना ही सोबत घेऊत. राजकारणात तडजोडी कराव्या लागतात वाईट गोष्टी विषयी आम्ही तडजोडी करीत नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत, देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झालेत त्यानंतर अजितदादा ही सोबत आलेत. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आहेत . केंद्रात सहकार मंत्रालय प्रथम निर्माण झाले आहे. त्यांच्याकडून निधी कोण आणू शकतो . राज्य सरकारकडून निधी कोण आणू शकतो ते मी आणू शकतो या निवडणुकीत आपले १८ पैकी १८ उमेदवार निवडून आले पाहिजे असे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले.
यावेळी राम पाटील सायाळकर, बालाजी पाटील कदम, शिक्षक नेते हरीभाऊ चव्हाण , दिनेश सावकार तेललवार,बाळू सावकार पालीमकर, खुशाल पाटील पांगरीकर, नगरसेवक भास्करराव पाटील पवार, बालाजी खिल्लारे, लक्ष्मण बोडके,सरपंच प्रल्हाद पाटील वडजे, कैलास पाटील कराळे , वर्षू पाटील कराळे, प्रशांत पाटील कराळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राम पाटील पवार, साईनाथ पाटील फाजगे, सचिन मुकादम, बालाजी जामगे, अन्सारभाई पठाण, बंडू पाटील वडजे, बाळू पाटील कदम बेनाळकर, स्वप्नील पाटील गारोळे, सरपंच मारोती पाटील कदम शेलगावकर,उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव, यांच्या सह सावरगाव सर्कल मधील सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन, व्हाइस चेअरमन, संचालक, सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, व्यापारी ,हमाल माथाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड यांनी केले तर आभार गजानन पाटील कराळे यांनी मानले.