दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/ उमरी – नायगाव मतदारसंघाचे लोकप्रिय शेतकरी नेते तथा उद्योगरत्न मा. श्री. मारोतराव कवळे गुरूजी संस्थापक अध्यक्ष व्ही पी के उद्योग समूह यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या व्ही पी के उद्योग समूहातील कारखान्याचे दिपावली निमित्ताने भाऊबीजेच्या शुभ मुहूर्तावर १ लाख मॅट्रिक टन उसाचे गाळप यशस्वीपणे पूर्ण झाले. त्याबद्दल सर्व व्यवस्थापनाचे कवळे गुरूजी यांनी अभिनंदन केले आहे. मा. चेअरमन , कार्यकारी संचालक, कारखान्याचे सरव्यवस्थापक, चिफ इंजिनिअर, चिफ केमिस्ट, मुख्य शेतकी अधिकारी, ऊस पुरवठा अधिकारी, सर्व खातेप्रमुख, उप खातेप्रमुख,कर्मचारी, कामगार, ऊस तोड ठेकेदार , ऊस वाहतूक ठेकेदार, ऊस तोड कामगार आणि सर्व शेतकरी सभासद यांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या सहकार्य केले त्याबद्दल कारखाना प्रशासनातर्फे हार्दिक अभिनंदन करून पुढील गाळपासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.