
दैनिक चालु वार्ता
वैजापूर तालुका प्रतिनिधी भारत पा.सोनवणे
वैजापूर (छत्रपती संभाजीनगर)- वैजापूर तालूक्यातील शिऊर येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दहावी २००२ बॅच वर्गमित्र, मैत्रिणी, शिक्षक तब्बल २१ वर्ष नंतर एकत्र येत स्नेहमिलन संमेलन सोहळा अर्थात गेट-टुरगेदर शिऊर येथिल श्री रावणेश्वर महादेव मंदिर येथे शनिवारी सर्वांच्या उपस्थितीत जुन्या आठवणीना उजाळा देत हा सोहळा संपन्न झाला यावेळी प्रमूख पाहूणे वर्गशिक्षक श्री भावसार सर, श्री गुळे सर, श्री जाधव सर, सौ. पवार मँडम, सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी वेळात वेळ काढून सर्व एकत्र आलेत एकविस वर्षानंतर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला शाळेतील आठवर्णींनी काहींच्या चेहन्यावर हास्य उमलले तर काहींचे जुन्या आठव्णींनी डोळे पाणावले. त्यानंतर मान्यवर शिक्षकांनी अमूल्य असे मार्गदर्शन केले व सर्वांचे कौतुक केलेत व काही मित्र व मैत्रीणींनी आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळी २१ वर्षापूर्वीचे शिक्षक व त्या वर्गातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी अशाप्रकारे शाळा भरल्याच्या आनंद सर्वांनी घेतला अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या आठव्णींना उजाळा देत शाळेतील गप्पा गोष्टी मारत खूप जुन्या आठवणींच्या गप्पा मारत दिवस रंगला होता सर्वांना जेवणाची व्यवस्था शिऊर येथील मित्रांनी केली या कार्यक्रमासाठी २००२ बॅचचे सत्तरच्या वर मित्र- मैत्रीणी सहभागी झाले होते ह्या गेट टुगेदर चे अतिशय उत्कृष्ट नियोजन करण्यातआले होते…