मौ.शिरशी बु.येथील शेतकरी अतिवृष्टी व गारपीट निधीच्या लाभापासून वंचित
शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे बेमुदत उपोषणाला बसणार
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
बाजीराव गायकवाड
नांदेड(कंधार):- मौ.शिरशी बु. परीसरात गारपिट व अतिवृष्टी होऊन शेतक-यांच्या पिकांचे व फळबागांचे खुप मोठे नुकसान झाले होते.नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले अधिकारी व तलाठी यांनी गावात मोजक्या शेतकरी यांच्या शेतात जाऊन पाहणी केली व काही शेतकरी याना उडवा उडवीचे उत्तर देत म्हणाले की,मी तुमच्या शेतात नंतर येतो दोन दिवसांनी आज काम आहे
मी पायी चालु शकत नाही असे काहींना तर काहींना तुमचे नाव यादीत टाकलो असे उत्तर देत शेतकऱ्यांना लाभापासुन वंचीत ठेवले व काहीचे नुकसान कमी व चुकीचे नोंद दाखवण्यात आली व काहीची पाहणी केली नाही अशाप्रकारे काही खरे शेतकरी गारपिट लाभापासुन वंचीत राहीले आहेत. तहसीलदार राम बोरगांवकर यांनी प्रत्यक्षात गावात येऊन दवडी देउन चौकशी करून लाभापासुन वंचीत राहीले आहे त्यांना शासनाचे अनुदान मिळवून देण्यात यावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालया येते दि.२८/११/२०२३.रोजी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा सिरशी बु.येथील शेतकरी विजय येडे, अशोक येडे, गणेश येडे, राहुल येडे, मधुकर येडे, पांडुरंग दमकोंडवार, विजयमाला येडे (ग्रामपंचायत सदस्य)पांडूरंग जाधव,शिवराज कैलासे,रावसाहेब येडे, भाऊसाहेब येडे,माधव जाधव,व्यंकटी मारोती जाधव,सुमनबाई येडे,गोविंद कैलासे,व गावातील इतर नागरिकांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन अतिवृष्टी व गारपिटीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.