
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड पाटील
नांदेड/ उमरी :- व्हि पी के उद्योग समूहाच्या संजीवनी गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून ऊस उत्पादकांना गांडुळ खत वाटपास सुरुवात
व्हि पी के उद्योग समूहाच्या माध्यमातुन आपल्या भागातील शेतकऱ्याचे उत्पन्न वाढले पाहीजे या हेतूने उद्योग समूहाचे चेअरमन श्री मारोतराव पाटील कवळे गुरुजी हे सातत्याने व अभ्यासपूर्ण पद्धतीने नवनवीन योजना राबवण्यात अग्रेसर असतात त्या अनुषंगाने शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवायचे असल्यास प्रथम त्यांची जमीन सुपीक व संपन्न करावी लागेल त्यासाठी गांडूळ खताचे अत्यंत फायदे व महत्त्व आहे जसेकी जमिनीत गांडुळांची संख्या चांगली असेल तर जमीन भुसभुशीत होते. गांडूळ खतामुळे जमिनीची पाणी शोषूण घेण्याची आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढल्यामुळे पाण्याची १५ ते २० टक्क्यांपर्यंत बचत होते. जमिनीचा पोत सुधारतो. या सर्व बाबी विचारात घेऊन गांडूळखत निर्मितीचे प्रकल्प उभारून शेतकऱ्यास केवळ १०/- रूपये प्रती किलो या रास्त दरात व उधारी तत्वावर वाटप करण्याचे नियोजन केले आहे.
*गांडुळ खताचे फायदे:-*
१) जमिनीचा सामू उदासीन करण्यास मदत होते.
२) गांडूळ खतवापरामुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मात बदल होतो.
३) जमीन भुसभुशीत होऊन पोत सुधारतो.
४) उत्पादन क्षमता व जमिनीची सच्छिद्रता वाढते.
५) जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगला होऊन पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, त्यामुळे कमी पाण्यात पिकाचे उत्पादन घेता येते.
६) जमिनीमध्ये प्राणवायूचे प्रमाण वाढते, त्यामुळे जैविक क्रिया वाढते.
७) गांडूळ खतामुळे उपयुक्त जिवाणूंची संख्या ३ ते ५ पटीने वाढते.
८) पिकाच्या उत्पादनात वाढ होते, त्याचबरोबर उत्पादनातील प्रत सुधारते.
९) रासायनिक खतवापरात बचत होऊन, खतावरील काही खर्च कमी होतो.
१०) पिकाचे उत्पादन वाढते.
ज्या शेतकऱ्यांना गांडुळखत खरेदी करायचे आहे त्यांनी आपल्या भागातील कृषी सहाय्यक किंवा विभाग प्रमुख यांच्याशी संपर्क साधावा
सावंत एस जे…
ऊस विकास अधिकारी
व्हि पी के उद्योग समूह