
दैनीक चालु वार्ता
म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा – तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासासाठी खासदार सुनिल तटकरे आणि महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शासनाचे वेगवेगळया योजनेतून विशेषतः वीज,पाणी,रस्ते,कृषि,शाळा,अंगणवाडी,साकव,सामाजिक सभागृह आदी प्रस्तावित विकास कामांसाठी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे असे असताना सदरील प्रस्तावित कामांना प्रशासकीय मंजुरी घेण्यासाठी लहान सहान कारणाने विलंब होत आहे जर का प्रस्तावित कामांना वेळेत मंजुरी घेता आली नाही तर पुढील वर्षी शासन दरबारी वाढीव निधी मिळण्यास अडचण होईल तसे होऊ नये यासाठी संबंधीत कार्यालयीन अधिकारी आणि पदाधिकारी यांनी म्हसळा तालुक्यातील गाव वाडी वस्तीवर विकास कामांसाठी उपलब्ध केलेला निधी वेळेत खर्च करण्याच्या सूचना वजा इशारा मंत्री आदिती तटकरे यांनी म्हसळा पंचायत समिती येथे तालुका विकास कामांचा आढावा सभेत दिला आहे.सभेत गावा गावात जळ जीवन योजने अंतर्गत कार्यान्वित असलेल्या पाणी पुरवठा योजना रखडल्या आहेत या बाबत तक्रारी आल्या असता मंत्री आदिती तटकरे यांनी संबंधीत अधिकारी वर्गाला ठेकेदारांच्या कामाचा ठेका लागलीच रद्द करून मंजुर योजनांचे फेर निवीदा काढा अशा सक्त सूचना केल्या.एकंदरीत मंत्री आदिती तटकरे यांनी म्हसळा तालुक्यातील मंजुर विकास कामांत होत असलेल्या विलंबा बाबत नाराजी व्यक्त केली आहे.म्हसळा पंचायत समिती आढावा सभेत मंत्री आदिती तटकरे यांच्या समावेत तालुका अध्यक्ष समीर बनकर,जिल्हा चिटणीस महादेव पाटील,माजी जिल्हा सभापती बबन मनवे,माजी सभापती नाझीम हसवारे,नगराध्यक्ष संजय कर्णिक,माजी नगराध्यक्ष असहल कादीरी,सुनिल शेडगे,संदीप चाचले,संतोष सावंत,छाया म्हात्रे,महिला अध्यक्षा मिना टिंगरे,जिल्हा चिटणीस सोनल घोले,मधुकर गायकर,अनिल बसवत, रेश्मा कानसे,शगुप्ता जहाँगीर,प्रांताधिकारी डॉ.दिपा भोसले,तहसिलदार समिर घारे,गटविकास अधिकारी बाळासाहेब भोगे,मुख्याधिकारी विठ्ठल जाधव,पी.आय.संदीपान सोनावणे,बांधकाम अभियंता मुंगे, सहा.अभियंता शेट्ये,जिल्हा परिषद बां.अभियंता मोरे,पाणी पुरवठा अभियंता जे.यु.फुलपागारे, मराविम अभियंता पटवारी,पं.स.कक्ष अधिकारी दिघीकर आदी अधिकारी मान्यवरांसह तालुक्यातील सरपंच,कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते.