
दै.चालु वार्ता
पुणे प्रतिनिधि व्येंकटेश ताटे
रुबी संघटनेच्या घटनाबाह्य कामकाज प्रकरणी रुबी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कारणे द्या नोटीस काढत तात्काळ सुनावणी घ्या असे सांगितले त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त त. श. अत्तार यांनी रुबी कर्मचारी व शिवसेनेच्या निवेदनानंतर कारवाई चालू केली .
याबाबत रुग्णालयातील कामगारांनी शिवसेना पक्षाचे अजय बापू भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते धनंजय जाधव (शिवसेना शहर समन्वयक), गौरव साईनकर (शिवसेना उपशहर प्रमुख), निलेश धुमाळ (कसबा विभाग प्रमुख), सागर देव (कसबा विधानसभा संघटक ) , समीर ढोक (छत्रपती शिवाजीनगर प्रभाग प्रमुख) यांच्या वतीने रुग्णालयातील कामगारांचे पिळवणूक कशाप्रकारे होत असल्याची तक्रार साहाय्यक आयुक्तांकडे करीत रुग्णालयातील वास्तव सांगितले.
त्यानुसार कामगार आयुक्त त. श. अत्तार यांनी कार्यवाही चालू केली व शासन प्रक्रियेनुसार दोन ते तीन दिवस सुनावणी तात्काळ घेत संघटना आणि कर्मचारी या दोघांची मते लक्षात घेऊन तात्काळ शासनाचा प्रतिनिधी युनियनच्या कार्यालयात जाऊन स्वतः माहिती घेऊन शासकीय कार्यवाही करतील असा आदेश कामगार आयुक्त ने दिला.